पुणे

''राजभाषा हिंदी अत्यंत सुलभ, सोपी व मधुर''

CD

WDL26B02933
वडाळा (ता. उ. सोलापूर) : माऊली महाविद्यालयात राजभाषा हिंदी सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर.
---
माऊली महाविद्यालयात
हिंदी सप्ताहाचा समारोप
विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
वडाळा, ता. ५ : माऊली महाविद्यालयात आयक्यूएसी, हिंदी विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजभाषा हिंदी सप्ताहाचा समारोप झाला. ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हिंदी सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांसाठी शुद्धलेखन, निबंध, कविता, भित्तिपत्रक, वक्तृत्व, हिंदी सामान्यज्ञान आणि काव्यवाचन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
डॉ. वडजे यांनी राजभाषा हिंदीला संविधानाने दिलेले स्थान, तिची वाटचाल, इतिहास आणि वर्तमानातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. भारतात जवळपास साडेचार हजार भाषा असून हिंदी ही सोपी, सुलभ आणि मधुर भाषा असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदीला संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिकृत भाषांमध्ये स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. शिरीष भोसले यांनी भाषा व साहित्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासह मानवी जीवन समृद्ध होत असल्याचे सांगितले. साहित्याचे जीवनातील महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. परमेश्वर सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले, तर प्रतीक्षा गुरव हिने आभार मानले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. दत्तात्रय हरवाळकर, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. बाळासाहेब वाघचवरे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. विजय म्हमाणे, प्रा. डॉ. प्रतिभा बिरादार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT