पुणे

हिंदू जागृत झाले, तर जग जागृत होईल

CD

हिंदू जागृत झाले, तर जग जागृत होईल

कॅनडातील भाषणात मोहन भागवत यांचे प्रतिपादन

टोरांटो, ता. ३१ (वृत्तसंस्था) : हिंदू विचारसरणी ही विविधतेचा स्वीकार आणि त्या विविधतेमागील मूलभूत एकतेची जाणीव यावर आधारित आहे. हिंदू जागृत झाले, तर सर्व जग जागृत होईल, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
टोरांटो येथे झालेल्या ‘हिंदू विश्व बंधू’ कार्यक्रमात भागवत बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी भारताच्या वैश्विक सहकार्याच्या संस्कृतीवर आणि विविधतेतील एकतेवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘जगात कुठेही भारताकडे मदत मागितली गेली तर त्याने ती नाकारलेली नाही; तसेच मदत मागितली नसतानाही भारत मदतीचा हात पुढे करतो. ही भारताची परंपरा आणि भारताचा डीएनए आहे. म्हणूनच तुम्ही ‘हिंदू जागृत झाले तर जग जागृत होईल’ असे म्हटले जाते.” ‘हिंदू’ ही संकल्पना कोणतीही विशिष्ट भाषा, उपासना पद्धती किंवा जीवनशैलीपुरती मर्यादित करता येणार नाही. हिंदू सर्वांचा आदर करतात आणि सर्वांचा स्वीकार करतात. भारतीय आध्यात्मिक परंपरा मानव आणि निसर्गातील एकात्मतेची शिकवण देते. विविधता ही भारतातील एकतेसाठी अडथळा नसून, विविधता हेच एकतेचे स्वरूप आहे, असेही त्यांनी नमूद केले.
भागवत यांनी जगाने ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही प्राचीन संकल्पना स्वीकारण्याचे आवाहन केले. “भौतिक जगात व्यक्तींचे शरीर, आकार आणि वर्ण वेगवेगळे असू शकतात; मात्र मूलत: आपण सर्व एक आहोत. त्यामुळे इतरांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. या ज्ञानामुळे चिरस्थायी आनंद आणि समाधान मिळते,” असे ते म्हणाले.

‘विश्वगुरू झालो, महासत्ता नाही’
भारत आपल्या चारित्र्यामुळे ‘विश्वगुरू’ बनला, ‘महाशक्ती’ नाही, असे सांगताना भागवत म्हणाले, ‘‘भारताच्या पूर्वजांनी जगभर प्रवास करून ज्ञान आणि सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार केला. रस्ते, नौका, विमाने किंवा मोटार वाहने नसताना, बैलगाड्या आणि घोडे असताना आमचे पूर्वज मेक्सिकोपासून सैबेरियापर्यंत गेले. त्यांनी पायी हिमालय पार केला, चीन, सैबेरिया आणि मंगोलियात गेले. छोट्या नौकांमधून आग्नेय आशियात पोहोचले. त्यांनी कोणताही देश जिंकला नाही किंवा कोणाचे धर्मांतर केले नाही. त्यांनी ज्योतिष, आयुर्वेद आणि सांस्कृतिक मूल्यांचे ज्ञान दिले.”

मोदींचा कॅनडा दौरा
या कार्यक्रमाला कॅनडाचे माजी संरक्षणमंत्री आणि अल्बर्टाचे माजी पंतप्रधान जेसन केनी उपस्थित होते. त्यांनी भारत-कॅनडा संबंधांमध्ये नव्याने निर्माण झालेल्या गतीचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाच्या अखेरीस दुसऱ्यांदा कॅनडाला भेट देणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला. मोदींच्या आगामी भेटीचा उल्लेख होताच उपस्थितांनी ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील 'आरएसएस स्मृती मंदिरा'बाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

SCROLL FOR NEXT