पुणे

हिंगोली बाजार समितीमध्ये २ लाख ४७ हजार ४३९ क्विंटल आवक

CD

हिंगोली बाजारात हळदीची
२.४७ लाख क्विंटल आवक

एप्रिल ते सप्टेंबर दरम्यानची स्थिती; सरासरी १४२४० रुपये दर

माणिक रासवे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या सहामाहीत (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर) एकूण २ लाख ४७ हजार ४३९ क्विंटल हळदीची आवक झाली. हळदीला प्रति क्विंटल किमान १२ हजार ७०० रुपये, कमाल १५ हजार ६०८ रुपये, तर सरासरी १४ हजार २४० रुपये दर मिळाला.
२०२५-२६ मध्ये १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण १ लाख ९८ हजार ९०२ क्विंटल हळदीची आवक झाली होती. त्या वेळी हळदीला प्रति क्विंटल १० हजार ८०५ ते १२ हजार ९२२ रुपये दर मिळाले होते. त्या तुलनेत यंदा हळदीच्या आवकेत ४८ हजार ५३७ क्विंटलने वाढ झाली आहे. तसेच प्रति क्विंटल १ हजार ८९५ ते २ हजार ६८६ रुपये जास्त दर मिळाले.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीने हळदीसाठी स्वतंत्र संत नामदेव हळद मार्केट स्थापन केले आहे. हिंगोलीसह परभणी, नांदेड तसेच विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा आदी जिल्ह्यांतूनही या मार्केटमध्ये हळदीची आवक होते. आवक जास्त असल्यास आठवड्यातील पाच दिवस (सोमवार ते शुक्रवार) हळदीची आवक घेतली जाते. जाहीर लिलावाद्वारे हळदीची खरेदी केली जाते.

एप्रिल ते सप्टेंबर २०२६ हळद आवक, भाव स्थिती
महिना...आवक (क्विंटल)...सरासरी भाव (रुपये)
एप्रिल...२२६९६...१३५९१
मे...४२७९५....१२७००
जून...५३६३६...१२८९७
जुलै...६१६६२...१५१३७
ऑगस्ट..३९०७०...१५६०८
सप्टेंबर...२७५८०...१५५११

कोट ----
२०२५ मध्ये हळद लागवडीत वाढ झाल्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आवक वाढली आहे. सप्टेंबरपर्यंत हळदीचे सरासरी दर प्रति क्विंटल १५ हजार रुपयांपर्यंत राहिले. ऑक्टोबरमध्ये हळदीचे दर प्रति क्विंटल २० हजार रुपयांवर गेले आहेत. यंदा हळद लागवड क्षेत्रात वाढ झाली असली, तरी दुष्काळामुळे उत्पादकता घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षी हळदीची आवक कमी राहू शकते.
- संपत मुंडे,
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : ब्रेकिंग न्यूज! नविद मुश्रीफ पराभूत; सतेज पाटलांची आघाडी १४ जागांवर आघाडी

Latest Marathi News Live Update : नावेद मुश्रीफ यांचा धक्कादायक पराभव; सतेज पाटलांचे निकटवर्तीय शशिकांत खोत विजयी

Namo Shetkari Yojana Latest Update : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? 5 हजारांची दुष्काळी मदत घोषित, पण नमो शेतकरी योजनेच्या 4 हजारांचे काय?

Gokul Election Latest News : गोकुळमध्ये पुन्हा ट्विस्ट! तीनही माजी अध्यक्ष पिछाडीवर; मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफांना धक्का? सतेज पाटलांचे महायुतीसमोर तगडे आव्हान

टायगर श्रॉफवर अल्पवयीनाकडून गोळीबार, दुसरा हल्लेखोर रॅपिडो ड्रायव्हर कम सुपारी किलर; धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT