हिंजवडी - आयटी पार्कमधील शिवाजी चौक परिसरात चक्राकार वाहतुकीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. 
पुणे

हिंजवडीत चक्राकार वाहतूक कायमस्वरूपी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी राबविण्यात येणारा चक्राकार वाहतुकीचा प्रयोग आता कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. पोलिसांनी यासंदर्भातील अंतिम आदेश २७ नोव्हेंबर रोजी काढला आहे. हिंजवडीतील शिवाजी चौक ते विप्रो सर्कल फेज एक ते जॉमेट्रिक सर्कल चौक ते शिवाजी चौक या भागातील वाहतूक विनाअडथळा व्हावी, यासाठी चक्राकार वाहतूक सुरू करण्यात आली आहे. 

पोलिसांनी सप्टेंबर महिन्यापासून या भागात चक्राकार वाहतुकीचा प्रयोग राबविण्यास सुरवात केली होती. आतापर्यंत त्याला चारवेळा मुदतवाढ देण्यात आली. चक्राकार वाहतुकीमध्ये शिवाजी चौकातून उजवीकडे वळण्यास आणि यू टर्न घेण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. शिवाजी चौकात येणाऱ्या आयटी कंपन्यांच्या बसेस आणि अन्य जड वाहनांना वाकडकडे जाण्यासाठी कस्तुरी चौकात उजवीकडे वळून इंडियन ऑइल चौकातून जावे लागणार आहे. जांभूळकर जिम, शेल पेट्रोल पंपाजवळील दुभाजक स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुला ठेवण्यात येणार आहे. 

जॉमेट्रिक सर्कल ते विप्रो सर्कल फेज दोनदरम्यानचे सर्व दुभाजक, शिवाजी चौक ते फेज एक सर्कलमधील पाच दुभाजक, फेज एक चौक ते जॉमेट्रिक सर्कल चौका दरम्यानचे सर्व दुभाजक आणि मेगा नाईन चौक ते शिवाजी चौकादरम्यानचे सर्व दुभाजक बंद करण्यात येणार आहेत. माणगाव रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना विप्रो सर्कल फेज एक चौकातून शिवाजी चौकाकडे सरळ जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे, असे अप्पर पोलिस आयुक्‍त मकरंद रानडे यांनी कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT