पिंपरी, ता. ५ : हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी लक्ष्मी चौकात उड्डाणपूल प्रस्तावित आहे. तसा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) तयार केला आहे. तो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. हा पूल कसा असेल, याचे सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केल्यानंतर आरखडा अंतिम होणार आहे.
हिंजवडीतील हा पूल नेमका कोण उभारणार, याबाबत गेल्या वर्षभरापासून घोळ सुरू होता. पहिल्यांदा ‘एमआयडीसी’कडून त्याची कार्यवाही करण्यात येणार होती. त्यानुसार दुमजली पुलाचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र, हे काम पुन्हा ‘पीडब्लूडी’कडे देण्यात आले. पण, या कालावधीत कोणतीही हालचाल झाली नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात ११ सप्टेेंबरला झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याने पुलाच्या कार्यवाहीला गती मिळाली आहे. हिंजवडीतील वेगवेगळे मार्ग लक्ष्मी चौकात एकत्र येतात. त्यापैकी बहुतांश रस्ते हे ‘एमआयडीसी’च्या मालकीचे आहेत. त्यामुळे पुलाबाबत बदल अथवा इतर सूचना कळाव्यात, यासाठी आराखडा त्यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. तसेच, ‘पीएमआरडीए’चे म्हणणेदेखील मागवण्यात आले आहे. उड्डाणपुलासाठी येत्या दोन महिन्यांत भूसंपादन आवश्यक आहे. तर, एक डिसेंबरपासून काम सुरू करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी लक्ष्मी चौकातील पूल कसा उपयोगी ठरेल, यावर अभ्यास सुरू आहे. त्यावर तीन वेगवेगळे पर्याय असून, सोईस्कर ठरेल तो निश्चित केला जाईल.
- भरतकुमार बावीस्कर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.