पुणे

हिंजवडीत एकतर्फी प्रेमातून खून; आरोपीला उरुळी कांचनमध्ये बेड्या

CD

उरुळी कांचन, ता. ७ : हिंजवडी परिसरात शालेय मैत्रिणीच्या प्रियकराचा एकतर्फी प्रेमातून लोखंडी रॉडने निर्घृण खून करून तरुणीला गंभीर जखमी करण्यात आले. यानंतर अर्टिगा मोटारीमधून पुणे-सोलापूर महामार्गाने पळून जाणाऱ्या आरोपीला उरुळी कांचन (ता. हवेली) पोलिसांनी नाकाबंदी करून अटक केली. ही घटना शुक्रवारी (ता. ७) उघडकीस आली.
दिनेश महादेव झांबरे (वय २३, मूळ रा. पळशी, ता. पंढरपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश आणि पीडित तरुणी यांचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुण्यात शिक्षण घेत असताना तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. याचा राग मनात धरून दिनेशने हिंजवडी येथे दोघांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर आरोपी अर्टिगा कारमधून (क्र. एमएच १३ इके ५८२८) पंढरपूरच्या दिशेने पळून जात होता. हिंजवडी पोलिसांनी ही माहिती तत्काळ उरुळी कांचन पोलिसांना दिली. त्यानुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या पथकाने महामार्गावर नाकाबंदी करून वेगात येणारी कार अडवली आणि दिनेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांचे कौशल्य अन् ताळमेळ 
हिंजवडीत गुन्हा घडल्यानंतर आरोपी सोलापूरच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी तातडीने उरुळी कांचन पोलिसांना सतर्क केले. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही मिनिटांत महामार्गावर नाकाबंदी लावण्यात आली, ज्यामुळे आरोपीला काही तासांतच जेरबंद करणे शक्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

Heart Attack Prevention : वयाच्या तिशीतच का येतोय हार्ट अटॅक? तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका; 'या' सवयी तातडीने बदला नाहीतर...

SCROLL FOR NEXT