सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २७ : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन तीन नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी मेट्रो स्थानके व परिसराचा पाहणी दौरा करून तयारीचा आढावा घेतला.
उद्घाटनाची संभाव्य तारीख जवळ आल्याने प्रकल्पाशी संबंधित कामे, आवश्यक सुविधा आणि प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला जात आहे. आयुक्तांच्या दौऱ्यामुळे तयारीला वेग आल्याचे चित्र आहे. हा सोहळा बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होण्याची शक्यता आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.
या मार्गावरील २३ पैकी १७ स्थानके सज्ज आहेत. उद्घाटनासाठी यापूर्वी काही तारखा चर्चेत आल्या होत्या. पण, अद्याप मेट्रो सेवा सुरू झालेली नाही.
---------
दृष्टिक्षेपात
मेट्रो मार्गिकेची लांबी ः २३.२ किलोमीटर
स्थानके ः २३
खर्च ः सुमारे ८,३१३ कोटी
राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी ः २०१८
प्रकल्पाच्या कामाला सुरुवात ः २५ नोव्हेंबर २०२१
मेट्रो ट्रेन - २२
सेवेची वेळ - सकाळी ६ ते रात्री १२.३०
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.