Encroachment 
पुणे

अखेर हिंजवडीतील अतिक्रमणे काढली (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - वाहतूक पोलिसांनी हिंजवडीत सुरू केलेला एकेरी वाहतुकीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी शिवाजी चौक परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे शनिवारी (ता. ८) काढण्यात आली. पोलिस, एमआयडीसी आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्‍त प्रयत्नांतून ही कारवाई करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेली मोहीम संध्याकाळपर्यंत सुरू होती. यामध्ये या परिसरातील ४०० अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पुढील तीन दिवस ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.

गेल्या आठवड्यामध्ये वाहतूक पोलिसांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शिवाजी चौकामध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबविण्यास सुरवात केली. आयटी कंपनीमध्ये जाणाऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे. दरम्यान, रस्त्यालगत असणारी अतिक्रमणे, रस्त्यावरील खड्डे, अशा समस्या ‘सकाळ’ने (ता. ७) मांडल्या होत्या. प्रशासनाने तत्काळ त्याची दखल घेत हा रस्ता अतिक्रमणांतून मुक्‍त केला. 

आयटी पार्कमधील फेज वन आणि फेज टूमधील कंपन्यांच्या बाहेरील पदपथ, मोकळ्या जागांमध्ये लावण्यात आलेल्या हातगाड्यांवर कारवाई करण्यात आल्याने आयटी पार्कची अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटका झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT