Hinjewadi-Traffic
Hinjewadi-Traffic 
पुणे

चक्राकार वाहतुकीच्या ‘चक्रात’ आयटीयन्स

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या चक्राकार वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांच्या सुमारे चार किलोमीटर रांगा लागत आहेत. ठोस उपाययोजना नसल्यामुळे आयटीयन्स त्रस्त झाले आहेत.

तत्कालीन पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी चक्राकार वाहतुकीचा प्रयोग सुरू केला. सध्या शिवाजी चौकामधील सिग्नल बंद असून बॅरिकेड तुटले आहेत. संध्याकाळी येथे वाहनांची लांबलचक रांग लागलेली असते. त्यामुळे भूमकर चौकाकडून आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा होतो. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळेही कोंडीत भर पडते. त्यामुळे अपघाताची शक्‍यता आहे.

विप्रो सर्कल समस्यांच्या गर्तेत
अनधिकृत पार्किंग, एकाच चौकामध्ये येणारे दोन रस्ते, सिग्नल यंत्रणा नसणे, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती यामुळे विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कल या रस्त्यावर चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. एमआयडीसीने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे ठरविले होते. मात्र त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

SCROLL FOR NEXT