Traffic
Traffic 
पुणे

कायमची उपाययोजना करणार - मकरंद रानडे

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘‘हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक नागरिक व आयटीयन्स यांच्या सूचनाही विचारात घेऊन या समस्येवर कायमची उपाययोजना केली जाईल,’’ असे पिंपरी चिंचवडचे अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी शुक्रवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत सांगितले.  

रानडे म्हणाले, ‘‘हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा स्थानिक व आयटीयन्स गेल्या अनेक वर्षांपासून त्रास सोसत आहेत. त्यामुळे तेथील रस्त्यांचा व चौकांचा अभ्यास करून तसेच नागरिकांच्या सूचनांचा विचार करून अनेक बदल करण्यात आले आहेत. वाकडकडून शिवाजी चौकाकडे जाताना सेल पेट्रोलपंपाजवळ एक पंक्‍चर काढण्यात आले आहे, तर डी-मार्ट समोरील पंक्‍चर बंद करण्यात आले आहे. हा बदल पुढील पंधरा दिवसांसाठी असणार आहे. या बदलामुळे वाहतुकीवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करून पुढे हा बदल कायम ठेवण्यात येईल.’’

रस्त्यासाठी जागा देण्याची तयारी
हिंजवडीकडे जाणाऱ्या विनोदे वस्ती रस्त्यासाठी स्थानिकांनी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास वाहतूक आणखी सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच रस्त्यावरील अतिक्रमणे, रस्ता रुंदीकरण व उड्डाण पुलाची आवश्‍यकता यांचाही विचार होणे गरजेचे आहे,’’ अशी माहिती मकरंद रानडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

SRH vs GT : हैदराबाद - गुजरात सामना पाण्यात! काही न करता पॅट कमिन्सचा संघ पोहचला प्ले ऑफमध्ये

SCROLL FOR NEXT