पुणे

कोल्हापूरः नदीकाठच्या जमिनी वाहून जाण्याचा धोका भरपाईची मागणी

CD

नदीकाठच्या जमिनी वाहून जाण्याचा धोका

गडहिंग्लज, जि कोल्हापूर : हिरण्यकेशी नदीकाठावरील जरळीच्या हद्दीतील शेतजमिनी पाण्याच्या प्रवाहाने घसरत आहेत. साधारण ३० टक्क्यांपर्यंत जमिनींचे नुकसान झाले आहे. तातडीने उपाययोजना राबविल्या नाहीत, तर शेतकऱ्यांच्या शेत जमिनी शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करावी आणि पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

यासंदर्भात तहसीलदार ऋषिकेष शेळके यांना निवेदन देऊन मनसेने याकडे लक्ष वेधले आहे. तहसीलदारांनी पाटबंधारे विभागाला संबंधित निवेदन पाठवून त्यावर कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. नदीकाठावरील शेतकरी मुळात अल्पभूधारक आहेत.

दरवर्षीच्या महापूरात आणि इतर वेळच्या पाण्याच्या प्रवाहात थोडी-थोडी जमीन घसरत आहे. आतापर्यंत प्रत्येकाच्या शेतातील ३० टक्के जमीन व माती वाहून गेली आहे. पात्र रुंद होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. संबंधित विभागाने तातडीने जमिनीची पाहणी व मोजणी करावी. जमिनी घसरण्याची कारणे शोधून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या पाहिजेत. नदीकाठाला आवश्यकतेनुसार संरक्षक भिंत किंवा दगडी बंधारा बांधावा, बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीची नोंद घ्यावी आणि संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शेतकरी संजय चौगुले, शिवगोंडा पाटील, विनायक चौगुले, विठ्ठल चौगुले, विनायक चौगुले, अजित चौगुले, दुंडाप्पा चौगुले आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लडाख आमचाच! भारताने २८ ठिकाणांची नावे जाहीर करताच चीनची आडमुठी भूमिका, नामकरणाला विरोध

दिल्लीत १५ वर्षांच्या मुलांमध्येही GI कॅन्सर! वायुप्रदूषण ठरतंय का छुपा धोका? वाचा डॉक्टर काय सांगतात

IndiGo Flight Cancellation: इंडिगोचा मोठा निर्णय! 'त्या' देशाकडे जाणारी उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार यांनी शेतकरी व सभासदांशी साधला संवाद; विजयाबद्दल मानले आभार

Manchar News : अवसरी खुर्द येथील सरकारी ओढ्यावरील अतिक्रमण हटविले; महसूल विभागाची मोठी कारवाई, शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT