Hirdoshi Dam Affected Sakal
पुणे

Agitation : हिर्डोशी धरणग्रस्त अंदोलकांचे तोंडाला काळे फासुन निषेध

भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण क्षेत्रातील हिर्डोशी येथील धरणग्रस्तांचा पुनर्वसन प्रश्न गेल्या 17 वर्षांपासून प्रलंबीत राहिला आहे.

किरण भदे

भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण क्षेत्रातील हिर्डोशी येथील धरणग्रस्तांचा पुनर्वसन प्रश्न गेल्या 17 वर्षांपासून प्रलंबीत राहिला आहे.

नसरापूर - मागील पाच दिवसापासुन प्रशासनाच्या विरोधात हिर्डोशी ता. भोर येथे अंदोलन करणारया निरा देवघर धरणग्रस्तांची प्रशासनाने दखन न घेतल्याने तोंडाला काळे फासुन प्रशासनाचा निषेध केला आहे व धरणे आंदोलन सुरुच ठेवुन दखल न घेतल्यास धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा या धरणग्रस्तांनी दिला आहे

भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण क्षेत्रातील हिर्डोशी येथील धरणग्रस्तांचा पुनर्वसन प्रश्न गेल्या 17 वर्षांपासून प्रलंबीत राहिला आहे. यासाठी कायदेशीर संघर्ष केल्यानंतरही या हिर्डोशी ग्रामस्थाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.त्यामुळे त्यांचा संयम संपला असल्याने हिर्डोशी ग्रामस्थांनी हिर्डोशी येथे ता.17 डिसेंबर पासुन धरणे आंदोलन सुरु केले आहे.माञ या अंदोलनाची शासनाने अद्याप दखल न घेतल्यानेधरणग्रस्थांनी आज ता.21 रोजी तोंडाला काळे फासुन प्रशासनाचा निषेध करत आंदोलन सुरु ठेवले आहे.

2007 सालापासून प्रशासनातील वेगवेगळ्या स्तरावर तहसीलदार, प्रात, अप्परजिल्हाधिकारी, आयुक्त, मंत्रालय, मंत्री महोदय, मुख्य सचिव (पुनर्वसन) या सर्वांबरोबर वेळोवेळी झालेल्या बैठकीत प्रशासनाने आपली चूक मान्य करत या 35 खातेदारांना जमीन वाटप होणे आवश्यक असल्याबाबत तोंडी सांगितले आहे. तसेच तत्कालीन मंत्री यांनी निर्देश देऊन सुद्धा प्रशासन हा फारसा विषय गांभीर्याने घेतलेला नाही, धरणग्रस्तांचा प्रदीर्घ संघर्ष व वाताहत पाहता पुनर्वसन यंत्रणेच्या चुकीची शिक्षा गेली 17 वर्ष धरणग्रस्त भोगत आहेत. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारा मुळे धरणग्रस्तांचे आयुष्य उध्वस्त झाले असून, ही बाब प्रशासना बद्दल धरणग्रस्तांमध्ये चिड निर्माण करणारी आहे.त्यामुळे हिर्डोशी धरणग्रस्तांनी पुणे विभागीय आयुक्त यांना पत्राद्वारे स्पष्ट इशारा देत आंदोलनाला सुरवात केली. या धरणे आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास सामूहिक आत्महत्या शिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरत नसल्याचे धरणग्रस्थांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे व चुकीमुळे गेली 17 वर्ष धरणग्रस्त पुनर्वसनापासून वंचित राहिल्यामुळे प्रत्येकी एकरी 15 लक्ष रुपये प्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्यात यावी. तसेच सर्व खातेदारांना कायदेशीर पात्रतेप्रमाणे जमीन वाटप प्रक्रिया पूर्ण करावी तो पर्यंत धरणे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Warning: ''इराणसोबत सामंजस्य करार नाहीच, ते फक्त एक पत्र...'', पुन्हा हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

IAS transfers: महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल! १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; माजी DGP रश्मी शुक्लांवर नवी जबाबदारी

Baba Vanga Prediction : निम्मा जून उलटूनही पाऊस नाही! 2026 बद्दल बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरतीये का? नेमकं काय म्हटले होते?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली

RBI Recruitment: विनापरीक्षा लाखो रुपयांची नोकरी, फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; आरबीआयच्या भरतीसाठी अर्ज कसा करणार?

SCROLL FOR NEXT