Shaniwarwada
Shaniwarwada 
पुणे

ऐतिहासिक वास्तू होताहेत इतिहासजमा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, हा उद्देश राज्य सरकार, महापालिका आणि वास्तूंच्या मालकांचादेखील आहे. मात्र, त्यांचे जतन कसे होईल, यासाठी कोणतेही निश्‍चित धोरण नाही. महापालिकेने अशा वस्तूंचे जतन करण्यासाठी ‘हेरिटेज टीडीआर’ ही संकल्पना आणली. मात्र, ती अपयशी ठरली आहे. त्यामुळे या वास्तूंचे जतन करावयाचे असेल आणि शहरातील पर्यटनाला चालना द्यावयाची असेल, तर त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यातूनच या ऐतिहासिक ठेव्याचे जतन होऊ शकते.

शहरात पन्नासहून अधिक वास्तू ऐतिहासिक आहेत. राज्य सरकारच्या निकषांनुसार त्यामध्ये तीन वर्गवारी आहेत. पहिल्या वर्गात म्हणजे ‘अ’ श्रेणीतील वास्तूमध्ये कोणताही बदल अथवा पुनर्बांधणी करता येत नाही. उर्वरित दोन वर्गांमध्ये काही अटी व शर्तींवर बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

शहरात असलेल्या एकूण वास्तूंपैकी जवळपास ऐंशी टक्के खासगी मालकीच्या आहेत. त्यांचे जतन व्हावे, पुढच्या पिढीला इतिहासाची माहिती व्हावी, हा हेतू त्यामागे आहे. परंतु, त्यांचे जतन कसे केले जाईल, त्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना राज्य सरकार अथवा महापालिकेच्या स्तरावर नाही. त्यामुळे आज बहुतांश वास्तू मोडकळीस आल्या आहेत. कोणत्याही स्वरूपाचा मोबदला जागामालकांना मिळत नाही. देखभाल-दुरुस्तीचा खर्च परवडत नाही. बदल करण्यास परवानगी नाही. अशा कारणांमुळे हा ऐतिहासिक ठेवा मोडकळीस आला आहे.

दर पाच वर्षांनी निवडणुका येतात. राजकीय पक्षांकडून जाहीरनामा, वचननामा तयार केला जातो. परंतु, एकाही पक्षाकडून शहरातील ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्याच्या दृष्टीने जाहीरनाम्यात योजना मांडली जात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT