historical record 556 mm rainfall pune 3 TMC water storage in Mulshi Dam Sakal
पुणे

ताम्हिणीत ऐतिहासिक महाविक्रमी ५५६ मिलीमीटर पाऊस, 24 तासांत मुळशी धरणांत ३ टीएमसी पाणीसाठा

गेल्‍या किमान पंचवीस वर्षांत झाला नाही असा पाऊस ताम्हिणी (ता.मुळशी) येथे गेल्‍या चोवीस तासांत झाला आहे. ताम्हिणी परिसरात चोवीस तासांत ५५६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

माले : शंभर वर्षांत बोटावर मोजता येईल असा ऐतिहासिक पाऊस बुधवार (ता.२४) चोवीस तासांत झाला. गेल्‍या किमान पंचवीस वर्षांत झाला नाही असा पाऊस ताम्हिणी (ता.मुळशी) येथे गेल्‍या चोवीस तासांत झाला आहे. ताम्हिणी परिसरात चोवीस तासांत ५५६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

ही शंभर वर्षांतील अत्‍यंत दुर्मिळ नोंदींपैकी एक नोंद आहे. ताम्हिणी बरोबरच शिरगाव परिसरातही ४८४ मिमी, आंबवणे येथे ४४० मिमी, माले ३०२ मिमी, मुळशी ३०५ मिमी, दावडी ३६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या विक्रमी पावसामुळे गेल्‍या चोवीस तासांत ३ टीएमसी पाणीसाठा आल्‍याने एकूण १४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर धरण ७० टक्‍के भरले आहे. त्‍यामुळे गुरुवार (ता.२५) दुपारी मुळा नदीत विसर्ग सुरु करण्‍यात येणार आहे.

मुळशी धरण भागातील सुमारे ५२ गावांतील डोंगर, दरी, ओहोळी, ओढे, नाल्‍यांमधून येणारे पाणी धरणात जमा होते. धरणात पाणी येण्‍याचे विस्‍तीर्ण पसरलेले स्‍त्रोत मोठया संख्‍येने असल्‍याने जोराच्‍या पावसात मुळशी धरणातील पाण्‍याचा साठा वेगाने वाढतो. गेले चार-पाच दीवस सुरु असलेल्‍या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी अत्‍यंत वेगाने वाढत आहे.

बुधवार झालेल्‍या विक्रमी पावसामुळे गेल्‍या अवघ्‍या चोवीस तासांत सुमारे ३ टीएमसी पाणी गोळा झाले आहे. खडकवासला धरण दीड वेळा भरेल इतका पाणीसाठा एका दिवसात आले आहे. याविक्रमी पावसामुळे अनेक ठिकाणी तुटफुट, दरडी कोसळणे, झाडे पडणे, महावितरणचे वाहिन्‍यांचे खांब पडल्‍याच्‍या घटना अनेक ठिकाणी घडल्‍याचे समोर येत आहे.

जुन महिना कोरडा गेला, जुलैचे का‍ही दिवस उघडीप पडल्‍याने धरणातील पाणीसाठा अत्‍यल्‍प होता. मागील आठ दीवसांत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आता तर अतिवृष्‍टीने मुळशी धरण परिसरात धुमाकुळ घातला आहे.

ताम्हिणीत या हंगामात आत्‍तापर्यंत एकुण साडेचार हजार मिमी पेक्षा जास्‍त पाऊस झाला आहे. त्‍याचप्रमाणे दावडी, शिरगाव, आंबवणे या पसिरातही आत्‍तापर्यंत तीन हजार मिमी पेक्षा जास्‍त पाऊस झाला. मुळशी धरण परिसरात गुरुवारी सकाळी नोंदलेला गेल्‍या चोवीस तासांतील पाऊस मिलीमीटर मध्‍ये (कंसात या हंगामातील एकुण पाऊस) पुढीलप्रमाणे.

ताम्हिणी ५५६ (४६३० ), दावडी ३६७ (३५४९), आंबवणे ४४० (३३००) शिरगाव ४८४ (३२८१ ), मुळशी ३०५ (१८६६ ), माले ३०२ (१६८०), 'पावसाचा अंदाज घेऊन पाऊस वाढत राहिल्‍यास सुरक्षिततेचा उपाय म्‍हणुन गुरुवार (ता.२५) दुपारी दोन वाजता २५०० क्‍युसेक वेगाने मुळशी धरणातुन मुळा नदीत नियंत्रीत विसर्ग करण्‍यात येईल. धरणात येणा-या पावसाच्‍या पाण्‍याचा प्रमाण वाढत गेल्‍यास त्‍यानुसार विसर्ग कमी जास्‍त करण्‍यात येईल.' अशी माहिती मुळशी धरण व्‍यवस्‍थापक बसवराज मुन्‍नोळी यांनी दीली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

SCROLL FOR NEXT