पुणे

दोन डॉक्टरांची विभागीय चौकशी तर तंत्रज्ञाची सेवा समाप्त

CD

दोन डॉक्टरांची विभागीय चौकशी तर तंत्रज्ञाची सेवा समाप्त
आमदार आवताडे यांच्या प्रश्नाला मंत्री आबिटकर यांचे उत्तर; एचआयव्हीचा चुकीचा अहवाल महागात

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २४ : अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न आयसीटीसी केंद्राने सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा चुकीचा अहवाल दिल्याप्रकरणी संबंधित प्रयोगशाळा तंत्रज्ञाची सेवा कायमस्वरूपी समाप्त करण्यात आली आहे. तर या प्रकरणी अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश गुड्डे व वैद्यकीय अधिकारी शर्वरी नेरे यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली. आमदार समाधान आवताडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

तंत्रज्ञाच्या चुकीच्या अहवालामुळे संबंधित महिलेला पंढरपूर येथील एआरटी केंद्रात अनावश्यक औषधोपचार घ्यावे लागले. तसेच सासरच्या मंडळींकडून तिला घराबाहेर काढण्यात आल्याने तिचे सामाजिक व कौटुंबिक जीवनही विस्कळित झाले होते. या प्रकरणी महिलेने आत्मदहनाचा इशाराही दिला होता. आरोग्य उपसंचालक, पुणे यांच्या स्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालानुसार संबंधित प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या कामामध्ये झालेल्या हलगर्जीपणामुळे त्यांची सेवा कायमस्वरूपी समाप्त करण्यात आली आहे.
अकलूज येथील आयसीटीसी समुपदेशक यांची धाराशिव येथे बदली करण्यात आली आहे. शिवाय त्यांना मूळ वेतनावर आणण्यात आले आहे. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यातील आयसीटीसी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि नियमित आढावा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Leader Arrest : राज ठाकरेंच्या शिलेदाराला फसवणूक प्रकरणात अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Yuzvendra Chahal Retirement : युझवेंद्र चहलने अचानक घेतली निवृत्ती; पोस्टने खळबळ, म्हणाला, माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक, पण...

Mumbai News: शौचालयातील विषारी वायूमुळे 2 तरुणांचा मृत्यू; गोरेगावातील 'त्या' कारखान्याला टाळे ठोकण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : कॅप्टन स्मित मच्छार यांचा 'अशोक चक्रा'साठी विचार करावा, मिलिंद देवरा यांची पंतप्रधान मोदींना विनंती

Captain Smit Machhar: ‘कॅप्टन स्मित, धन्यवाद!’; इस्रायलकडून मुंबईत होर्डिंग्जद्वारे भारतीय वैमानिकाला सलाम

SCROLL FOR NEXT