Pune News
Pune News sakal
पुणे

Pune News : होर्डिंग्ज व्यावसायिक झाडांच्या मुळावर ; पुण्यात अडथळा ठरणारी झाडे तोडली,अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील चौका-चौकांत उभारलेल्या होर्डिंग्जमुळे नागरिकांचे जीव धोक्‍यात येत असतानाच आता याच होर्डिंग्जमुळे काही जण थेट झाडांच्याही मुळावर उठल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची सद्यःस्थिती आहे.

शहरातील मंगळवार पेठेत काही वर्षांपूर्वी होर्डिंग्ज कोसळून झालेल्या अपघातात दोन नागरिकांचा जीव गेला होता, तर मागील एक ते दीड वर्षापूर्वीच रावेत परिसरातही होर्डिंग्ज कोसळल्याने पाच नागरिकांचे जीव गेले होते. त्या घटनेनंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. मात्र पुन्हा शहरासह उपनगरांत तसेच महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या हद्दीतही बेकायदा होर्डिंग्ज वाढत असल्याची सद्यःस्थिती आहे. महापालिकेची जाहिरातफलक नियंत्रण नियमावली धाब्यावर बसवून बेकायदा होर्डिंग्ज वाढत आहेत. दरम्यान, शहराच्या काही भागांत होर्डिंग्जसाठी झाडांची कत्तल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकारही पुढे आला आहे.

वानवडी, हडपसर, महंमदवाडी यासह काही भागांत बेकायदेशीरपणे झाडे कापण्याचे प्रकार घडले आहेत. वानवडीमधील जगताप चौक, संविधान चौक या ठिकाणी तर होर्डिंग्ज ठळकपणे दिसण्यासाठी झाडांच्या मोठमोठ्या फांद्या कापल्या आहेत. एका होर्डिंगसाठी तर संपूर्ण झाड तोडले आहे.

कारवाई होणार कधी?

शहराच्या मध्यवर्ती भागातीलच ठराविक होर्डिंग्जवर महापालिकेकडून कारवाई होते. मात्र उपनगर व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. यात मोठे आर्थिक गणित असल्याने तसेच अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. नागरिकांचे जीव गेल्यावरच महापालिका बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वानवडीतीलच जगताप चौक, संविधान चौकात दोन होर्डिंग्जमध्ये १० फूट अंतर ठेवण्याच्या नियमाचेही उल्लंघन करण्यात आले आहे.

होर्डिंगसाठी झाडे कापण्याचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाची वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना तातडीने दखल घेण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचाही आदेश देण्यात आला आहे.

- माधव जगताप, उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग, महापालिका

होर्डिंगसाठी झाडांची कत्तल केली जात आहे. त्यानंतरही संबंधित व्यावसायिक किंवा त्याची जबाबदारी असणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई होत नाही, हे दुर्दैव आहे.

- संग्राम काटे, नोकरदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT