मार्केट यार्ड परिसरातील कृषी बाजार समिती कार्यालया समोर धरणे आंदोलन करताना पथारी व्यावसायिक.
मार्केट यार्ड परिसरातील कृषी बाजार समिती कार्यालया समोर धरणे आंदोलन करताना पथारी व्यावसायिक. 
पुणे

पथारी व्यावसायिकांचे धरणे

सकाळवृत्तसेवा

पुणे - बाजार समितीमधील परवानाधारक पथारी व्यावसायिकांच्या टपऱ्या बंद करण्याचा आदेश समितीने दिला आहे. या निर्णयाविरोधात परवानाधारकांनी कृषी बाजार उत्पन्न समितीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पथारी व्यावसायिक पंचायतचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. या वेळी, पथारी व्यावसायिक पंचायतचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे, संतोष नांगरे, हनुमंत बहिरट, वसंत चोरगे आणि पथारी व्यावसायिक उपस्थित होते.

आढाव म्हणाले, 'पथारी व्यावसायिकांचे हातावर पोट असूनही त्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. गेल्या 38 वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिकांना प्रशासनाने नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक देऊन त्यांच्यावर अन्याय केला आहे.'' सरकार रोजगार निर्माण करणार म्हणत असताना या लोकांचा व्यवसाय का बंद केला जात आहे, असा सवालही आढाव यांनी उपस्थित केला.

कृषी बाजार उत्पादन समिती प्रशासक बाळासाहेब देशमुख म्हणाले, 'रस्त्यावर टपऱ्या असल्याने सतत वाहतूक कोंडी होते. पथारी व्यवसायिकांना कित्येक वर्षांपासून टपऱ्यांसाठी जागा दिली असून, यापुढे त्यांनी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच, पथारी व्यवसायिकांनीही इतरांचा विचार करून भूमिका बदलण्याची गरज आहे.''

या परिसरात 1982 पासून चहाची टपरी आहे. चहाच्या व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, बाजार समितीने अधिकृत परवाना असताना टपऱ्या बंद करण्याचा आदेश दिला आहे, यामुळे रोजंदारीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नियमित कर भरूनही आमच्यावर कारवाई केली जात आहे.
- बाळासाहेब गिधे, पथारी व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT