pcmc 
पुणे

‘हॉकर्स झोन’ अाधी; नंतर कारवाई

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमणे व टपऱ्यांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. त्याबाबत प्रशासनाने कारवाई करणे आवश्‍यक आहे. मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांसाठी हॉकर्स झोनची व्यवस्था करावी, अशी मागणी गुरुवारी महानगरपालिका सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केली.

सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. महापालिकेच्या मिळकतीवर व सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे हॅडबिल्स (पत्रके), कागदी भित्तिपत्रके लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या जाहिरातधारकांना ७५० प्रतिचौरस मीटर इतके प्रशमन शुल्क आकारण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव सभेसमोर मंजुरीसाठी होता. 

या प्रस्तावाला नामदेव ढाके यांनी उपसूचना दिली. ७५० प्रतिचौरस मीटरऐवजी ६७५ प्रतिचौरस मीटर इतके प्रशमन शुल्क (दंड) आकारण्यात यावे, अशी ही उपसूचना होती. संबंधित उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर झाला.

कोण काय म्हणाले?
 सचिन चिंचवडे : अनधिकृत होर्डिंग्ज, हातगाड्या यांचे प्रमाण वाढण्यापूर्वीच कारवाई करायला हवी.
 सुजाता पालांडे : संत तुकारामनगरचे टपरीनगर झाले आहे. पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करावे. कारवाई झालेल्या ठिकाणी पुन्हा टपऱ्या दिसायला नको. 
 तुषार कामठे : महानगरपालिका प्रशासनाने हॉकर्स झोन धोरणात नवीन हातगाडी व पथारीवाल्यांना सामावून घ्यावे. सध्या ‘पाणी अडवा आणि नगरसेवकांची जिरवा’ असे प्रशासनाचे धोरण सुरू आहे.
 सीमा सावळे : पोस्टरबाबत दंडाचा विषय आणताना तो अभ्यासपूर्वक आणावा.  
 प्रियांका बारसे : महानगरपालिका प्रशासनाला शिक्षक दिनाचा विसर पडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी.  
 केशव घोळवे : हॉकर्स झोनचे सर्वेक्षण बोगस झाले आहे. ते पुन्हा करण्यात यावे.
 अभिषेक बारणे : हॉकर्स झोनबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन त्यानंतर कारवाई करावी.
 सचिन चिखले : अनधिकृत पोस्टरसंदर्भात दंडाबरोबर कायदेशीर गुन्हा दाखल करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT