Holi 2021 Colour Peacock Feather Celebration Teacher 
पुणे

Video : मखमली पिसांच्या फुलोऱ्यांची रंगपंचमी;शिक्षकांनी जोपासला अनोखा छंद 

- संतोष खुटवड

पुणे : कोणाला नाणी तर कोणाला टपाल तिकीटांचा संग्रह करण्याचा छंद असतो. पण पर्यावरण संवर्धन व रक्षणाचा वसा घेतलेल्या एका अवलिया शिक्षकाने पक्ष्यांची विविध मखमली पिसे संकलित करण्याचा अनोखा छंद जोपासला आहे. आतापर्यंत त्यांनी भारद्वाज, ब्राह्मणी घार, नकटे बदक, नीलकंठ, पट्टकादंब, लांडोर, रोहित पक्षी, शृंगी घुबड, रानपोपट, चित्रबलाक अशा विविध दुर्मिळ पक्ष्यांच्या सुमारे १६० पिसांचा संग्रह केला आहे. सप्तरंगी पिसांचा फुलोरा पाहून रसिकमन रंगपंचमीच्या रंगांत रंगून जाते. 

खोपी (ता. भोर) येथील प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक दत्तात्रेय लांघी यांनी मुलांमध्ये पक्षीप्रेम व पर्यावरणाची अभ्यासात्मक गोडी वाढविण्यासाठी पिसांचा संग्रह केला आहे. पिसांचे दरवर्षी कलात्मक प्रदर्शन भरवून ते विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धन, जैवविविधेचा अभ्यास करण्यासाठी प्रेरित करतात. खोपी तसेच परिसरातील शाळांमध्ये त्यांनी स्वत: कॅमेराबद्ध केलेले पक्षी तसेच दुर्मिळ पिसांचे प्रदर्शन भरवतात.त्यास मुलांसह नागरिकांचाही मोठा प्रतिसाद लाभतो. यातून आबालवृद्धांना निसर्गातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या पक्ष्यांविषयी आपुलकी निर्माण होते. विद्यार्थी दशेतच पक्षीप्रेम वृद्धींगत होऊन पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांना निसर्गप्रेमाचे बाळकडू लांघी यांच्याकडून मिळत आहे. 
मित्र, कुटुंबीय, सहकारी व विद्यार्थी हे सर्वजण त्यांना सापडलेले कोणतेही पीस आणून देतात, यामुळे माझा संग्रह वाढण्यास मदत होते, असे लांघी यांनी सांगितले. 

पिसांमधील रंगद्रव्यामुळे ती पिवळी किंवा लाल दिसतात. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे पिसे सप्तरंगी दिसतात. रंगद्रव्यांच्या अभावी ती पांढरी दिसतात. रंगामुळेचे शत्रूपासून पक्ष्यांचे संरक्षण होते. पिसांच्या आकृतीबंधामुळे निरीक्षकांना नर किंवा मादी यातील फरक कळून येतो. 


धोकापत्करून पिसांचा शोध 
जंगलामध्ये दुर्मिळ पक्ष्यांचे पिसे केवळ नशिबानेच मिळतात. कोणता पक्षी अन्नासाठी कुठे फिरतो किंवा कोणत्या पाणवठ्यावर येतो तसेच त्यांच्या विसाव्याच्या ठिकाणांचा अभ्यास करावा लागतो. धोका पत्करून झाडावर बांधलेली घरटी शोधावी लागतात. या घरट्यांच्या खाली हमखास पिसे मिळतात. शत्रूने हल्ला केल्यामुळे दुखावलेली पिसे पक्षी चोचीने काढतात, असे लांघी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 


''पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासण्यासाठी जिल्ह्यातील नदी, धरणे, पाणवठे तसेच जंगलांमध्ये भटकंती करून पिसे संकलित केली आहेत. पक्ष्यांविषयी आत्मिक जिव्हाळा निर्माण व्हावा, निसर्ग संवर्धानासाठी प्रेरणा मिळावी यासाठी पिसांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचवतो. भविष्यात होणारा जैवविविधतेचा ऱ्हास थांबविण्यासाठी आजच्या पिढीला पुस्तकी ज्ञानाबरोबरच निसर्गाची अभ्यासात्क गोडी लावण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत असतो.''
- दत्तात्रेय लांघी, पक्षी निरीक्षक, प्राथमिक शिक्षक 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''संवर्धन कसे करावे, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी तसेच जैवविविधतेसाठी कोणत्या गोष्टींचा योग्य अभ्यास करावा, याची माहिती लांघीसर आम्हाला देतात. त्यांच्याकडील पिसांच्या संग्रहाने अनेक दुर्मिळ पक्ष्यांची जीवनशैली आम्हाला कळली आहे.''
- त्रिशा मोरे, विद्यार्थिनी 

'कोरोना प्रतिबंधासाठी सुक्ष्म नियोजन करा'; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे झेडपीला आदेश
 

या करिता होतो उपयोग... 
१. थंड हवामान, पाणी यापासून संरक्षण होते. 
२. अंड्यांना उबविण्यासाठी उपयुक्त 
३. झेप, वेग व दिशेवर नियंत्रण ठेवता येते. 
४. शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवता येते. 
५. विणीच्या हंगामात नर, मादी एकमेकांना आकर्षित करतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT