Pune-University 
पुणे

खोडसाळपणे पत्रक काढून दिली सुटी; पुणे विद्यापीठ करणार कडक कारवाई

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या अफवांचा फटका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाही बसला. खोडसाळपणाने विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या नावाने बनावट परिपत्रक काढून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांना २० मार्च ते ३० मार्च सुटी जाहीर केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला. मात्र, विद्यापीठाने हे परिपत्रक खोटे असून, अशी कोणतीही सुटी जाहीर केलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. 

पुणे विद्यापीठाने यापूर्वीच महत्त्वाचे कार्यक्रम पुढे ढकललेले आहेत. पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी २० मार्च ते ३० मार्च दरम्यान पुणे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्या आहेत, सर्वांनी याची नोंद द्यावी, असा मजकूर असलेले परिपत्रक आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रमुख डॉ. विजय खरे यांच्या स्वाक्षरीसह सोशल मीडियावर व्हायरस करण्यात आले.

डॉ. विजय खरे म्हणाले, ‘‘विद्यापीठाचा शिक्का व स्वाक्षरी बेकायदा वापरून सुटी जाहीर करण्यात आली. आंतरराष्ट्रीय केंद्राकडून असे कोणतेही परिपत्रक काढलेले नाही.’’

विद्यापीठाने कोणतीही सुटी जाहीर केलेली नाही. याविरोधात विद्यापीठाकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

Weather Update: उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा; तापमानात घट, पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज

School Safety Issue: उटवदच्या जिल्हा परिषद शाळेसमोर 133 केव्ही तारा; 250 विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, वारंवार निवेदनांनंतरही महावितरणचे दुर्लक्ष

Jalna Tragedy: सावंगी तलाव येथे १० वर्षीय साईनाथचा सर्पदंशाने मृत्यू; वेळेवर उपचार न मिळाल्याने ग्रामस्थांचा रुग्णालयासाठी आक्रोश

SCROLL FOR NEXT