घोडेगाव, ता. ७ : आंबेगाव तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोड्या करून भांडी व बंब चोरणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा व घोडेगाव पोलिसांनी अटक केली आहे. शहाजी ज्ञानदेव सोनवणे (वय २४, रा. पंचलिंगवस्ती, जुन्नर) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सहा गुन्ह्यांतील ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आंबेगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बंद घरे आणि हॉटेलमधून तांब्याचे बंब, भांडी व शेगडी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका टेम्पोचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. हा टेम्पो जुन्नर येथील शहाजी सोनवणे वापरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. सोमवारी (ता. ७) सोनवणे हा टेम्पोसह चिंचोली कोकणे येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ३ घरफोड्या व ३ चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीसाठी वापरलेला टेम्पो (क्र. एम. एच. १४, एन. ई. ६८२०), तांब्याचे बंब, भांडी व शेगडी असा एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घोडेगाव पोलिसांनी त्याच्यावर १२ कलमे दाखल केली आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक निरीक्षक महादेव शेलार, सागर पवार, उपनिरीक्षक सोनू शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार दीपक साबळे, शरद बांबळे यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.