पुणे

आता रोज प्या शहाळे पाणी!; "सेव्हन मंत्राज'च्या माध्यमातून घरपोच वितरण 

सकाळवृत्तसेवा

पुणे - आजारी आहात... डाएट करताय... मग त्यासाठी शहाळे अर्थातच नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्‍टरांसह आहारतज्ज्ञांकडून मिळत असतो. आरोग्याच्या बाबतीत शहाळे पाण्याचे असलेले महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. रोज एक शहाळे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्‍टर देत असतात. पण, अनेकदा चांगल्या शहाळ्यांची उपलब्धता होत नसल्याचा अनुभव येतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरी शहाळे आणले तर ते फोडण्याचे दिव्य असते. तेही केले तरी अडचण संपत नाही. उरलेल्या शहाळ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे शहाळे पाणी सेवनाचा आनंद घेणे अवघड बनत असल्याचा अनुभव अनेकांना येतो. आता ही चिंता सोडा. कारण, आता पॅकिंग स्वरूपात गोठवलेले शहाळे पाणी "सेव्हन मंत्राज'ने उपलब्ध केले आहे. अगदी तीच नैसर्गिक चव असलेले हे पॅकयुक्त शहाळे पाणी कधीही, कोठेही सेवन करता येणार आहे. सामान्यतः एका शहाळ्यामध्ये सुमारे 180 ते 230 मि.ली. पाणी असते. हा विचार करूनच 200 मि.ली. पॅक विकसित केला आहे. रोज एक पॅक याप्रमाणे आठवड्याची गरज म्हणून केवळ 420 रुपयांमध्ये सात पॅक या स्वरूपात हे शहाळे पाणी उत्पादन उपलब्ध केले आहे. हे पॅक घरातील फ्रिजरमध्ये ठेवता येतात. जेव्हा शहाळे पाणी प्यावयाचे आहे, तेव्हा एक पॅक बाहेर काढून ठेवावा. अर्ध्या तासात पॅकमधील पाणी वितळते. 

गोठवलेल्या शहाळ्यातील पाण्याची वैशिष्ट्ये 
1) 100 टक्के नैसर्गिक. 
1) प्रिझर्व्हेटिव्ह, साखर किंवा इतर घटकांचा वापर केलेला नाही. 
3) हातांचा स्पर्श न होता शहाळ्यातून पाणी काढले जाते आणि ते उणे 40 अंश सेल्सिअस तापमानाला गोठवले जाते. 
4) गोठवलेल्या स्वरूपातील पॅकेट घरातील फ्रिजरमध्ये सुमारे तीन महिने टिकते. 

शहाळे पाण्यातील पोषक घटक (प्रती 100 मि.लि.) 
प्रथिने - 0.5 ग्रॅमपेक्षा कमी 
कर्बोदके - 4.41 ग्रॅम 
फ्रुक्‍टोज - 4.62 ग्रॅम 
मेद (फॅट) - 0.5 ग्रॅमपेक्षा कमी 
सोडिअम - 21.30 मिलिग्रॅम 
पोटॅशिअम - 238.77 मिलिग्रॅम 
कॅल्शिअम - 29.97 मिलिग्रॅम 
मॅग्नेशिअम - 10.97 मिलिग्रॅम 
ऊर्जा - 18 किलो कॅलरी 
पीएच - 4 ते 6 दरम्यान 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कस्टमाइज्ड फळे व भाजीपाला सेवा 
पुणेकरांच्या मागणीनुसार "सेव्हन मंत्रा'ची कस्टमाइज्ड फळे व भाजीपाला वितरण सेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. www.sevenmantras.com या वेबसाइटला भेट देऊन आपली ऑर्डर नोंदवता येते. शुभारंभ ऑफर म्हणून किमान 350 रुपयांच्या खरेदीवर 200 ग्रॅम टाटा टी गोल्ड मिक्‍शर चहा तर 750 रुपयांच्या खरेदीवर 500 ग्रॅम टाटा टी गोल्ड मिक्‍शर चहा मोफत भेट देण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loni Kalbhor drugs crackdown : लोणी काळभोर पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात सलग धडक कारवाई; गांजा सेवन करणारे सात जण रंगेहात जेरबंद

CM Baliraja Road Scheme: पेण-सुधागड-रोहा ग्रामीण रस्ते विकासाला गती; ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ समितीचे सह-अध्यक्षपद प्रकाश देसाईंना

Latest Marathi News Live Update : अतिरिक्त दबाव टाकल्यास दुधाचे दर वाढतील आणि त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसेल - संजय निरुपम

'प्रायव्हेट जेट' ऐकलं असेल पण संपूर्ण रेल्वे ट्रेन बुक करता येते! भारतीय रेल्वेची खास 'FTR' सुविधा...

Narayangaon Crime : शेतीच्या कामासाठी जळगाव व नाशिक जिल्ह्यातील 36 शेतमजुरांना ठेवले डांबून; मुकादमावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT