पुणे

पुण्यात साडेआठ कोटींचा गृहकर्ज गैरव्यवहार उघडकीस; चौघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बोगस कागदपत्रांद्वारे तयार केलेली गृहकर्ज प्रकरणे एका फायनान्स कंपनीकडे सादर करीत तब्बल आठ कोटी 60 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फायनान्स कंपनी, बँक, जमिनीचे मूल्यांकन करणाऱ्या कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन फायनान्स कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे. 

प्रशांत दत्तात्र्यय मुक्ते (वय 37, रा.सोमवार पेठ), चंद्रकांत दामु मैदाड (रा.मुंबई), प्रवीण दशरथ सावंत (वय 42, रा.खारघर, मुंबई), विशाल टेमगिरे (वय 30, रा.कोथरुड) व वसंत किसन केळतकर (वय 27, रा.धायरी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर अमित गोखले, देवेंद्र भुस्कुटे, रामकृष्ण वालकर, राजेंद्र कोंढाळकर, संदिप कृष्णा कदम, गोरख पांचाळ, शैलेश महांकाळे, नितीन परब यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नितेश रमण नायर (वय 39, रा.यमुनानगर, निगडी) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

फिर्यादी हे एस्पायर होम फायनान्स (सध्याचे नाव मोतीलाल ओसवाल होम फायनान्स) या कंपनीमध्ये विभागीय व्यस्थापक (कलेक्‍शन) या पदावर कार्यरत आहेत. तर वसंत केळतकर हा संबंधीत कंपनीमध्ये शाखा व्यवस्थापक होता. केळतकर याने जमीन मालक मैदाड व अन्य व्यक्तींशी संगनमत करुन पुरंदरमधील खानवडी, मुंजवडी व टेकवडी येथील मिळकतींच्या मुळ किंमतीपेक्षा जास्तीची किंमत दाखवून बनावट व खोटे मुल्यांकन अहवाल बनविले. त्यानंतर बोगस कागदपत्रांद्वारे बनविलेल्या गृहकर्जासमवेत संबंधित मूल्यांकन अहवाल जोडून दिला.

एका प्रकरणामध्ये सहा कोटी 90 लाख 46 हजार रुपये, तर दुसऱ्या प्रकरणामध्ये एक कोटी 57 लाख 87 हजार रुपयांची कर्ज प्रकरणे केळतकर याने मंजूूर केली. त्यानंतर संबंधित रकमेचे धनादेश मैदाड याच्या बँक खात्यामध्ये जमा झाली. मैदाड याने या संबंधित व्यक्तींना दोन ते तीन टक्के याप्रमाणे कमिशन दिले. त्यानंतर उर्वरीत रक्कम स्वतःकडे ठेवली. मुक्ते व सावंत या दोघांचा दोन्ही प्रकरणांमध्ये सहभाग आहे. हा प्रकार फिर्यादी व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी 22 ऑगस्ट रोजी याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

त्यापैकी काही आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरीत आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार लांबतुरे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT