KDW26B05258
कुर्डुवाडी (ता. माढा) : खेळ पैठणीचा न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित माजी आमदार संजयमामा शिंदे, दगडू चोपडे, कैलास करंडे व अन्य.
---
८१३ महिलांनी रंगविला
‘होम मिनिस्टर’चा खेळ
कव्हेत ‘श्री महालक्ष्मी’चा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी, ता. १७ : कव्हे (ता. माढा) येथील श्री महालक्ष्मी उद्योग समूहाच्या वतीने आयोजित ‘न्यू होम मिनिस्टर : खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात ८१३ महिलांनी सहभाग नोंदविला. विविध खेळांमध्ये सहभागी होत महिलांनी आनंद लुटला. विजेत्यांना लाखो रुपयांची वस्तुरूप बक्षिसे देण्यात आली.
उद्योग समूहाचे संस्थापक दगडू चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरी गोडगे यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अश्विनी दळवे, पंचायत समिती सदस्या छायादेवी करंडे, सोनल चोपडे, वैभव चोपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तळ्यात-मळ्यात, उखाणे, संगीत खुर्ची, फुगे अशा विविध खेळांत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्यांना ड्रेसिंग टेबल, गॅस शेगडी, कपाट, किचन रॅक आणि पैठणी अशा वस्तू बक्षिसादाखल देण्यात आल्या. प्रत्येक सहभागी महिलेला फराळाचा डबा देण्यात आला. कार्यक्रमासाठी श्री महालक्ष्मी महिला उद्योग समूह, श्री महालक्ष्मी पुरुष बचत गट आणि अन्य महिला समूहांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.