पुणे

‘त्या’ महिला पोलिस उपायुक्ताच्या चौकशीचे आदेश : गृहमंत्री

पांडुरंग सरोदे -सकाळ वृत्तसेवा

पुणे :'' ‘व्हायरल झालेल्या 'त्या' क्लिपबाबत संबंधित महिला पोलिस उपायुक्तांची चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. चौकशी अहवालानंतर राज्य सरकार त्याबाबत योग्य तो निर्णय घेईल,'' अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

येक्षील विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी कोरोना उपाययोजनासंदर्भात आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शहरातील एका महिला पोलिस उपायुक्ताने कर्मचाऱ्याला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलमधून बिर्याणी आणण्यासाठी पैसे कशाला द्यायचे, अशा आशायाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या संदर्भात विचारले असता गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ‘मीसुद्धा ही क्लिप ऐकली असून, ही बाब निश्चितच गंभीर आहे. याबाबत चौकशी करून अहवाल द्यावा, असे आदेश पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. चौकशी अहवालानंतर राज्य सरकार त्याबाबत योग्य तो निर्णय घेईल.’

फोन टॅपिंगचे आदेश तत्कालीन सरकारकडून

‘पोलिस दलात बदली आणि बढतीबाबत कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या. त्याची पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसारच फोन टॅपिंग करण्यात आले,’ अशी माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात नुकतीच दिली आहे. या संदर्भात विचारले असता, गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ‘फोन टॅपिंग प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर आता बोलणे उचित होणार नाही. परंतु फोन टॅपिंगचे आदेश तत्कालीन सरकारच्या कालावधीतील आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ElNino2026: एल निनो डिसेंबरमध्ये सर्वोच्च पातळीजवळ ;सर्वाधिक तापमानाची शक्यता; जूनमध्ये न्यूट्रल स्थितीचा ‘सीपीसी’चा अंदाज

14 नोव्हेंबर 2026 पंचांग! शनिवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, सूर्योदय आणि दिनविशेष जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - 14 नोव्हेंबर 2026

Yearly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसे असेल तुमचे हे वर्ष..? ग्रहमान : ऑक्टोबर २०२६ ते ऑक्टोबर २०२७ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 नोव्हेंबर 2026

SCROLL FOR NEXT