Home Minister Satesh Patil reply to MLA Bhimrao Tapkir's suggestion of reduction 
पुणे

आमदार तापकीर यांच्या कपात सूचनेला गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांचे उत्तर

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला(पुणे) : ''पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली गावात ५० एकर जागेत लवकरच नवीन कारागृह होणार आहे.'' अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आमदार भीमराव तापकीर यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तापकीर यांनी येरवडा कारागृहात प्रमाणापेक्षा जास्त बंदी असल्याचा प्रश्न कपात सूचनेद्वारे उपस्थित केला होता.

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी २०२०- २१ च्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील उपस्थित केलेल्या कपात सूचना ४१५ मध्ये पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात संबंधी प्रश्न उपस्थित केला होता. येरवडा कारागृहाची बंदी (कैदी) क्षमता दोन हजार 449 असतांना सध्या कारागृहात दाखल बंदींची संख्या पाच हजार ८०० आहे. येरवडा कारागृहात आणि सुधारगृहात प्रत्येक कैद्याला झोपण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. तसेच सध्या प्रत्येक कैदी हा फक्त १.१७ ते १.१९ चौरस मिटर जागेत दाटीवाटीने राहत आहेत. एकमेकांच्या संपर्कामुळे दोन हजार १९० कैद्यांना त्वचा रोगाने ग्रासले आहे. असे निदर्शनास आणून येरवडा कारागृहातील बराकीची संख्या वाढविण्यासाठी आणि येरवडा कारागृहाच्या धर्तीवर स्वतंत्र नवीन कारागृहाची निर्मिती करण्यासाठी शासनाने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. 

हे वाचा - Corona Update - पुणे जिल्ह्यात 368 नवे रुग्ण; 16 जणांचा मृत्यू

याबाबत राज्याचे गृह राज्यमंत्री सतेश उर्फ बंटी डी. पाटील यांनी आमदार भीमराव तापकीर यांच्या कपात सूचना क्र. ४१५ ला दिलेल्या ११ नोव्हेंबर २०२० रोजीच्या लेखी उत्तरामध्ये येता मध्यवर्ती कारागृहाची अधिकृत बंदी संध्या दोन हजार ३२२ पुरुष
अधिक १२६ महिला अशी एकूण दोन हजार ४४९ असल्याचे नमूद केले होते.

सप्टेंबर २०२० अखेर कारागृहात सरासरी चार हजार ४३२ बंदी बंदिस्त असल्याने येरवडा कारागृहातील बंदयांची गर्दी कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात नवीन कारागृहाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील हवेली तालुक्यातील मौजे चिखली येथील ग.नं.५३९, गायरान येथील ५० एकर जागा निश्चित करून जागेची चतुर्सीमा, जागेचा सातबारा उतारा व आठ अ कागदपत्रांची माहिती येरवडा कारागृहास देणेबाबत विनंती केल्याचे सांगितले. कारागृहासाठी जागा आरक्षीत करण्याबाबतचे बंधपत्र देवून जागा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे गृह राज्यमंत्री सतेश उर्फ बंटी डी. पाटील यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. असे आमदार तापकीर यांनी सांगितले.

हे वाचा - पुणे-नाशिक महामार्गावर मोशी-प्राधिकरणातील राजे शिवछत्रपती चौकात एक रुपयामुळे ज्येष्ठ महिलेचा गेला बळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Winter Arthritis Pain in Women: महिलांनो सावधान! हिवाळ्यातील सांधेदुखीमागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारण

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिका तारखा जाहीर होताच मनसे आणि ठाकरे गट लागले कामाला

UP Accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दाट धुक्यामुळे ५ बस आणि कार एकमेकांना भिडल्या, ४ ठार, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

SCROLL FOR NEXT