पुणे

गृहप्रकल्पांचा मार्ग मोकळा 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे मोशीतील बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी आणि पिंपरी गावात राबविण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाला पंतप्रधान आवास योजनेच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने सुधारित मान्यता दिली आहे. त्यामुळे या तीनही प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील बेघर व्यक्तींसाठी महापालिकेने वेगवेगळ्या भागात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या रचनेनुसार प्रस्तावित सदनिकांची संख्या कमी अधिक होण्याची शक्‍यता आहे. योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून आधी राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मंजुरी महापालिकेने घेतली होती. त्यानंतर केंद्र सरकारनेचीही प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे महापालिकेने बोऱ्हाडेवाडी प्रकल्पाची निविदा काढली होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याची तयारी केली होती. मात्र प्रकल्पाचा निविदा दर प्राधिकरणाच्या प्रकल्पापेक्षा जास्त असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याला सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनीही हरकत घेतली होती. त्यामुळे गृहप्रकल्पाच्या रचनेत बदल करून निविदेतील दर कमी करावा लागला होता. ठेकेदारही दर कमी करून देण्यास तयार होता. तसा सुधारित प्रस्तावही तयार केला होता. तरीही महापालिकेच्या प्रकल्पाचे दर प्राधिकरणापेक्षा अधिक असल्याने सुधारित प्रस्तावही मागे घ्यावा लागला.

नवीन प्रकल्प अहवाल तयार करून त्याला पंतप्रधान आवास योजनेच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीची सुधारित मान्यता घेणे आवश्‍यक होते. त्यानुसार प्रशासनाने बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी आणि पिंपरी प्रकल्पांची फेररचना केली. त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून राज्यस्तरीय मूल्यमापन समितीकडे मान्यतेसाठी पाठविले होते. त्यास मुंबईत झालेल्या बैठकीत समितीने मंजुरी दिली. बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी, पिंपरी या प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासह चऱ्होली, रावेत, डुडुळगाव, दिघी, वडमुखवाडी आणि चिखली येथेही गृहप्रकल्प उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी आणि पिंपरी येथे उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांच्या रचनेत बदल केला होता. त्याचा सुधारित प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्याला योजनेच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीची मान्यता मिळाली आहे. 
- राजन पाटील, सहशहर अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Credit Card: शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत कर्ज! कोणती बँक देते सर्वात स्वस्त कर्ज? पात्रता, व्याजदर आणि अर्जाची संपूर्ण माहिती

BAN vs CA XI : बांगलादेशचा संघ ५४ धावांत तंबूत! ऑस्ट्रेलियन Campbell Thompson ने घेतल्या ८ विकेट्स; कसोटी मॅच डावाने जिंकली

Ichalkaranji Firing Incident : कबनूरमध्ये रील बनवणं बेतलं जीवावर! हवेत फैरी झाडताना गोळी थेट कवटीत घुसली, रक्तबंबाळ होऊन नीलेश जागीच कोसळला

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये FDAची मोठी कारवाई! ५ उद्योगांवर धाड; १,९४,५०,९२२ किंमतीचे तेल जप्त

मुंबईत भररस्त्यात बर्थडेचा धिंगाणा! बोनेटवर केक कटिंग अन् एअरगनने गोळीबार, भाजप कार्यकर्त्यासह १० जणांना अटक; Video Viral

SCROLL FOR NEXT