पुणे

coronavirus: लॉकडाऊनमध्ये भाडेकरूंचे आधारवड बनले त्यांचे घरमालक

सकाळवृत्तसेवा

नवी सांगवी ( पुणे ) - संपुर्ण जगासह राज्यावरील कोरोणाचे संकट वाढत असताना सगळीकडे लॉकडाऊन झाले आहे. अशा वेळी सर्व बाजुंनी आर्थिक डोलारा डगमगताना दिसत असताना गोरगरिब वंचित, मजुर यांना तर एक वेळचे जेवणही महाग झाले आहे. शासण व स्वयंसेवी संस्था दिवसाची रात्र करून या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आपले श्रम खर्च करीत आहे. या सर्वांचा विवेकी बुध्दीने सामान्य नागरिकही विचार करीत आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय आता सांगवी पिंपळे गुरव परिसरातील घरमालकांनी त्यांच्या भाडेकरूंचे या तीन महिण्यापर्यंतचे भाडे माफ करायला सुरूवात केली आहे. 

सांगवी पिंपळे गुरव परिसरात मजुरांपासून ते दररोजच्या कमाईवर गुजराण करणारा, लघुउद्योगांमध्ये काम करणारा असा लोअर मध्यम वर्गीय समाज चांगल्या प्रमाणावर आहे. असे लोक एक वा दोन खोल्यांमध्ये राहून आपला संसासाचा गाडा पुढे हाकत जेमतेम दिवस काढत आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत रोजची कमाई गमावून बसलेल्यांसमोर भविष्य धूरसर झाले आहे. मार्च संपला एप्रिल सुरू झाला त्यामुळे नवीन महिण्याचे घरभाडे दहा तारखेच्या आत द्यावे लागणार असले तरी ते कोठून आणि कसे भरायचे असा प्रश्न या लोकांसमोर उभा राहिला. तीन महिण्यांपर्यंत घरभाडे मागायचे नाही वा त्यांना खोल्या खाली करायचे नाही असा राज्य शासणाचा आदेश असला तरी आज ना उद्या ते द्यावेच लागणार आहे. पण अशा कठिण काळात काही घरमालकांनी महिणा ते तीन महिण्यापर्यंतचे भाडे आपल्या भाडेकरूंसाठी माफ केल्याने हे मजुरांच्या चेहऱ्यावर आपल्या घरमालकांच्या प्रती कृतज्ञतेची लकर दिसू लागली आहे. 

" देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... या कुसुमाग्रजांच्या ओळी प्रमाणे आज माझ्यासारख्या छोट्या घरमालकांना समाजाच्या ऋणातुन थोडेफार उतराई होण्याची वेळ आली आहे. ऑनलाईनच्या जमान्यात मागे पडलेली माणुसकी जपण्याची वेळ कोणीही घरमालकानी दवडू नये, हीच वेळ आहे एखाद्याच्या कुटुंबासाठी मायेचा आधारवड होण्याची. मी घर भाडे माफ केले तर इतरांनीही प्रयत्न करावा. "
- कैलास बनसोडे, घरमालक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT