school 
पुणे

न्यू मिलेनियम शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मिलिंद संधान

नवी सांगवी (पुणे) - दापोडी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित 'द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये दहावी व बारावीत विशेष नैपुण्य संपन्न केलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा कौतुक सोहळा नुकताच पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलगपणे तीन वर्षे उपजिल्हाधिकारी पदासाठी यश संपादन करणाऱ्या रोहिणी योगेश विरोळे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव शंकर जगताप, सदस्या स्वाती पवार, प्राचार्या इनायत मुजावर, पर्यवेक्षिका उषा साळवी व शिक्षक पालक वर्ग उपस्थित होता. 

इयत्ता दहावीतील स्नेहल कुडोंबे (96.80), तन्वी दपके (96.20), आरती खैरकर (95.60) तसेच बारावीतील सायन्स शाखेतील गुणवंत विद्यार्थी प्रियांका भोर(75.38), दुर्गा चौधरी (68.61), प्रशांत आगेडा (68) व वाणिज्य शाखेतील उमेरउमानी खान (81.38), करण राणे (74.77), निकीता मँथ्यू (73.54) हे सर्व विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव करण्यात आला. उपजिल्हाधिकारी विरोळे पाटील यांनी कठीण मेहनत परिश्रम, सातत्य एखाद्या गोष्टीचा ध्यास, संघर्ष, व त्यातून मिळणारे यश, परिवाराची साथ, गुरूजनाचे मार्गदर्शन याविषयी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. 

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष विजय जगताप, संचालक मंडळ सदस्य चंद्रकांत इंदूरे, डॉ विकास पवार, प्रताप बामणे, पर्यवेक्षिका उषा साळवी आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talaq-e-Hasan Case: मुस्लिमांमध्ये तलाक-ए-हसन म्हणजे काय? ऐकून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही संतापले, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Update LIVE : पक्षातून हकालपट्टी होताच ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर

Ethanol Plant Fire Explosion: उदापूर इथेनॉल प्लांटला भीषण आग; स्फोटाने ब्रह्मपुरीसह तीन गावे हादरली

Buldhana News: दोघांच्या त्रासाला कंटाळून; नांदुरा तालुक्यात ५० वर्षीय व्यक्तीने संपवले जीवन

Ahilyanagar News:'अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पॅचिंग पे पॅचिंग'; तीन वर्षात तीनदा दुरुस्तीसाठी १५ कोटी खर्चले..

SCROLL FOR NEXT