पुणे

पुणे : प्रयोगशील नववैज्ञानिकांचा सन्मान

सम्राट कदम

पुणे ः राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगशील नववैज्ञानिकांचा सन्मान करण्यात आला आहे. राष्ट्रीय रेडिओखगोलभौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) वतीने आयोजित प्रदर्शनातील पाचही गटांतील विजेत्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. खोडद येथील जायंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) आवारात भरणारे हे विज्ञान प्रदर्शन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाइन आयोजित करण्यात आले होते.

विज्ञान प्रदर्शनातील प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम एनसीआरएचे संचालक प्रा. यशवंत गुप्ता यांच्या अध्यक्ष्यतेखाली, विज्ञानप्रसारक प्रा. दिव्या ओबेरॉय, वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेजचे निलेश छडवलकर यांच्या उपस्तिथीत पार पडला. प्रदर्शन आणि सर्व प्रकल्प http://gmrtscienceday.ncra.tifr.res.in/gsd2021/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज या संस्थेच्या साहाय्याने ‘ग्रोइंग डॉट’ या मोबाईल ॲप च्या माध्यमातून हे प्रदर्शन ऑनलाइन आयोजित केले होते. आभार प्रदर्शन श्रीराम रमने यांनी केले.

प्रदर्शनातील गटनिहाय प्रथम क्रमांकाचे विजेते ः

१) इ. ५ वी ते ७ वीचा गट ः

प्रकल्प - इको-नेट

विद्यार्थी - प्रज्योत प्रदीप शेळके (श्री डी.जी.सराफ विद्यालय, संगमनेर)

२) इ. ८ वी ते १० वीचा गट ः

प्रकल्प - स्मार्ट सोलर वॉटर सेव्हिंग वाल्व्ह

विद्यार्थी - उर्जित प्रसन्न भावसार (पोदार इंटरनॅशनल स्कूल, नवी मुंबई)

३) इ. ११ वी ते १२ वी आणि आयटीआयचा गट ः

प्रकल्प - पुट अ स्टॉप टू दि वॉटर ड्रॉप

विद्यार्थी - काजल अजय गुप्ता (शेठ जी.एच.हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई)

४) बी.एस.सी, बीसीएस आणि डिप्लोमा गट ः

प्रकल्प - एटीएम सुरक्षा प्रणाली

विद्यार्थी - ओमप्रकाश दिपक वाघ (पूरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, लातूर)

५) बी.इ., एम.इ. आणि एमएससी गट ः

प्रकल्पाचे - नैसर्गिक नदी कचरा नियमन

विद्यार्थी - रिया विनय जैन, निशांत भीमराव सुरवाडे, तेजस प्रदीप शिरसाठ, रेवा मिलिंद कुलकर्णी

(के.के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक)

विज्ञान प्रदर्शन आकडेवारीत ः

देशभरातून सहभागी शाळा ः ३३०

प्रयोगांची संख्या ः ६८०

सहभागी विद्यार्थी ः ९००

ऑनलाइन सहभागी दर्शक संख्या ः ५५०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT