पुणे

सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष शिक्षकांचा सन्मान

CD

कोथरूड, ता. ७ : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या ६३० विशेष शिक्षकांचा सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद पुणे आणि बालकल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील ३७ मनोविकलांग शाळा, आठ अंध शाळा, पाच अस्थिव्यंग शाळा, २० मूकबधिर शाळा आणि एक शासकीय शाळेतील शिक्षकांसह प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विशेष शिक्षकांचा यावेळी सन्मान झाला.
दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे आयुक्त सत्यजित बडे म्हणाले, ‘‘बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना सध्या क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जात आहे. लवकरच इतर प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांनाही याच पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल.’’
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे म्हणाले, ‘‘दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविताना विशेष शिक्षकांना मोठ्या संयमाने, संवेदनशीलतेने आणि सातत्याने काम करावे लागते. त्यांची समर्पित सेवा ही अभिमानास्पद आहे.’’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राधाकिसन देवढे यांनी केले. यावेळी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अनिल निंबाळकर, उपशिक्षणाधिकारी अस्मा बेगम, बालकल्याण संस्थेच्या व्यवस्थापकीय अधीक्षक अपर्णा पानसे उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांची अमित शाहांशी भेट; दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT