पुणे

आदर्श समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकच देशाचा खरा शिल्पकार : महंत सुनिलगिरी महाराज सेवानिवृत्त शिक्षक सुनिल पंडित यांचा सपत्निक सत्कार ..

CD

KUK26B06477
कुकाणे : पाथरवाला विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक सुनील पंडित यांचा सपत्निक सत्कार करताना महंत सुनीलगिरी महाराज. समवेत आमदार विठ्ठल लंघे, प्राचार्य दादासाहेब वाबळे आदी.

शिक्षकच देशाचा खरा
शिल्पकार ः सुनीगिरी महाराज
कुकाणे ता १०: देशाचे भवितव्य घडविणारे शास्त्रज्ञ, इंजिनिअर, डॉक्टर राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आदर्श नागरिक आणि सक्षम व सशक्त समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकच देशाचा खरा शिल्पकार आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेवा आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज यांनी केले.
कुकाणे ग्रामसेवा मंडळ संचलित पाथरवाला माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सुनील पंडित हे २७ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांचा परिसरातील मित्रमंडळाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य दादासाहेब वाबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार विठ्ठल लंघे, दत्तात्रय खाटीक, कॉंग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष अभिजित लुणिया आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच दिनकरराव गर्जे यांनी केले.
लंघे म्हणाले, अध्यापक सुनील पंडित यांनी ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे करून
अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवले. त्यांचे पत्रकारिता, सामाजिक व धार्मिक कार्यात मोठे योगदान आहे.
यावेळी मित्रमंडळातर्फे अध्यापक सुनील पंडित यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सावंत यांनी केले तर लक्ष्मण लोखंडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT