पुणे

शेअर बाजारात अल्प वाढ

CD

शेअर बाजारात अल्प वाढ
‘होर्मुझ’ खुली होण्याबाबतच्या अनिश्चिततेमुळे मर्यादित वाढ

मुंबई, ता. १० : होर्मुझची सामुद्रधनी खुली होण्याबाबत पुन्हा अनिश्चितता दाटून आल्यामुळे आज भारतीय शेअर बाजार निर्देशांक फार प्रगती करू शकले नाहीत. ‘सेन्सेक्स’ ४३.२७ अंशांनी, तर ‘निफ्टी’ १३.१५ अंशांनी वाढला. दिवसभर ‘सेन्सेक्स’ ७८ हजारांच्या घरातच होता. दिवसभर त्यात पुष्कळ चढउतार आले आणि दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ ७८,५४२.४४ अंशांवर, तर ‘निफ्टी’ २४,५८३.८० अंशांवर स्थिरावला. 
आज मिड कॅप निर्देशांक वाढला, तर स्मॉल कॅप निर्देशांक घसरला. बांधकाम व्यवसाय निर्देशांक सव्वा टक्क्यांपेक्षा जास्त वाढला, तर खासगी बँका आणि ग्राहकोपयोगी वस्तू यांचे निर्देशांकही अर्धा टक्का वाढले. दुसरीकडे सरकारी बँकांचा निर्देशांक दीड टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. ऑइल अँड गॅस, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा यांचे निर्देशांक देखील घसरले. 
‘सेन्सेक्स’मध्ये टायटन तीन टक्क्यांपेक्षा जास्त वाढला, तर बजाज फायनान्स दोन टक्के वाढला. बजाज फिन्सर्व्ह, टाटा स्टील, एशियन पेंट या शेअरचे भावही एक टक्क्यापेक्षा जास्त वाढले. इन्फोसिस, ट्रेंट, एचसीएल टेक, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट या शेअरचे भावही वाढले. दुसरीकडे स्टेट बँक दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. एटर्नल, एनटीपीसी, आयटीसी हे शेअर एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले. टीसीएस, टेक महिंद्र, एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअरचे भावही घसरले. 

कोट......
होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अनिश्चितता असली, तरी भारतीय कंपन्यांच्या चांगल्या निकालांमुळे उत्साह आहे. भारताची देशांतर्गत वाढ आणि आर्थिक निर्देशांक चांगले असल्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल.
-  विनोद नायर, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अमित शाहांकडे राजीनामा अन् मोदींकडे माफीची मागणी; राहुल गांधींचं खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

IND vs SL, Test: साई सुदर्शनच्या जागी सरफराजच का? ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होण्यामागचं कारण आलं समोर!

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

Management Admissions: राज्यात बीबीए-बीबीएम-बीएमएस व एकात्मिक एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १२ हजार २८२ विद्यार्थ्यांना संधी, ८४८५ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

PSI Merit List Issue : पीएसआयची गुणवत्ता यादी रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

SCROLL FOR NEXT