पुणे

होर्मुझ सामुद्रधुनीतून चार खतवाहू जहाजे भारताकडे रवाना

CD

होर्मूझ सामुद्रधुनीतून चार खतवाहू जहाजे भारताकडे रवाना
---
खरीप हंगामासाठी खतपुरवठ्याला बळ; साठा १९६ लाख टनांवर
--
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होर्मूझ सामुद्रधुनी यशस्वीरीत्या पार करून युरिया, डीएपी आणि सल्फर वाहून आणणारी चार मालवाहू जहाजे भारतातील बंदरांकडे रवाना झाली आहेत. ही जहाजे कृष्णपट्टणम, काकीनाडा, पारादीप आणि मुंद्रा बंदरांवर पोहोचणार असून, त्यातील खतसाठा खरीप हंगामातील मागणी पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय खते व रसायने विभागाने सोमवारी (ता. २३) दिली.

या विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्चपासून देशांतर्गत खत उत्पादन १३३.१२ लाख टनांपर्यंत पोहोचले असून, या कालावधीत ४३.६९ लाख टन खतांची आयात करण्यात आली आहे.
तसेच नुकत्याच बोलावलेल्या जागतिक निविदेत भारताने १७.७० लाख टन युरियाची खरेदी निश्चित केली असून, खरीप हंगामासाठी युरिया, तसेच स्फुरद आणि पालाश (पी अँड के) खतांचा एकूण ताब्यात असलेला पुरवठा ९० लाख टनांहून अधिक झाला आहे.

भारताने ओमान, मलेशिया, व्हिएतनाम, जॉर्जिया, नायजेरिया, रशिया, फिनलंड, इजिप्त, अल्जीरिया, तुर्कीये आणि नेदरलँड्स येथून युरिया मागविला आहे. तर डीएपी आणि एनपीके खतांचा पुरवठा रशिया, मोरोक्को, इजिप्त, अमेरिका, जॉर्डन, दक्षिण कोरिया, ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया येथून लाल समुद्रमार्गे होत आहे.

२२ जूनपर्यंत देशातील एकूण खतसाठा १९६.०८ लाख टनांवर पोहोचला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत तो १६८.६७ लाख टन होता. युरियाचा साठा ८१.४४ लाख टन, डीएपी २०.९२ लाख टन आणि एनपीके खतांचा साठा ५५.९१ लाख टनांवर पोहोचला आहे. म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) साठा १२.६८ लाख टन असून, सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) साठा २५.१३ लाख टन आहे.

१ मार्चपासून आतापर्यंत देशात १५३.४० लाख टन खतांची विक्री झाली असून, गेल्या वर्षीच्या १४०.२० लाख टनांच्या तुलनेत ती अधिक आहे. यामध्ये ७९.१० लाख टन युरिया, ३४.८० लाख टन एनपीके आणि १९.८० लाख टन डीएपीचा समावेश आहे.

राज्य सरकारे, वितरण यंत्रणा आणि सहकारी संस्थांच्या समन्वयातून खरीप हंगामात खतांचा पुरेसा व सुरळीत पुरवठा राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही या विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याची 'सोनम'! केतन पाय घसरून पडला नाही, खून झाला; लोहगडावर काय घडलं? तरुणीसह प्रियकराला अटक

Who Will Lead DC? रिषभ पंत, लोकेश राहुल, अक्षर पटेल... IPL 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार? 'दादा' सर्व निर्णय घेणार

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT