पिंपरी, ता. ९ : शहरात महापालिका व खासगी अशा सातशेहून अधिक रुग्णालयांची नोंद आहे. त्यापैकी केवळ २६० रुग्णालयाने अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेतले असून, अद्याप साडेचारशेहून अधिक रुग्णालयांनी व्यावसायिक अग्निसुरक्षा नियमांची पूर्तता केली नाही. या आस्थापनांना अग्निशमन विभागाने नोटीस देऊनही त्यांनी त्याला केराची टोपली दाखवली आहे.
अमरावती जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर शासनाने राज्यातील सर्वच रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहरात गेल्या महिनाभरापासून त्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. त्यातच महापालिकेनेही कारवाईचा इशारा दिला आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार,
महापालिकेचे ४१ रुग्णालये, ओपोडी आहेत. त्यापैकी सर्वांनीच फायर ऑडिट पूर्ण केले आहे. त्यानुसार व्यावसायिक अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र दिले जाते. त्यानुसार तेथे अग्निसुरक्षा असणे महत्त्वाचे आहे. तो नियम हा सर्व आस्थापना व रुग्णालयांनाही लागू आहे.
सध्या लहान ओपोडी, दहा खाटांपासून सर्व रुग्णालयात जवळपास सातशे रुग्णालयाची नोंद आहे. त्यापैकी २६० जणांनी प्रमाणपत्र घेतले आहे. तर, इतर रुग्णालयांना वारंवार नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांनी अद्याप ‘फायर ऑडिट’ पूर्ण केलेले. याबाबत महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.
या बाबींची होते तपासणी
अग्निसुरक्षा प्रमाणपत्र देताना फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, अग्निशामक यंत्रे, फायर हायड्रंट, फायर लिफ्ट आणि आपत्कालीन निर्गमन मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली जाते. विशेषतः आयसीयू, ऑक्सिजन युनिट आणि उच्च जोखमीच्या विभागांवर स्वतंत्र लक्ष दिले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.