हॉस्पिटलमध्ये वृद्ध महिलेचे
सोन्याचे मंगळसूत्र लंपास
सांगोला पोलिसांत महिला कामगारावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ३१ : येथील मोहन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका आजारी व वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र सफाई कामगार महिलेने लबाडीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोपट भानुदास लवटे (वय ४६, रा. निजामपूर, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या आईवर २७ डिसेंबर २०२५ पासून मोहन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. २९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ९.१५ दरम्यान रेश्मा संतोष कांबळे (रा. शिवाजी कॉलनी, मिरज रोड, सांगोला; मूळ रा. मलमेवाडी, मिरज) ही महिला सफाई कामगार म्हणून काम करत असताना फिर्यादी यांच्या आईला बाथरूममध्ये घेऊन गेली. तिच्या आजारपणाचा व वयोवृद्धतेचा गैरफायदा घेत तिने तिच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे, अंदाजे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र कापून चोरून नेल्याचा आरोप आहे.
या घटनेप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल भोसले हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.