Hospital-Security
Hospital-Security 
पुणे

पास नकोत, पण सुरक्षारक्षक आवरा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रात्री दहाची वेळ... रुग्णालयाच्या एका खोलीतील खाटेवर आई एकटीच... रुग्णालयाने नातेवाइकांसाठी अधिकृत दोन पास दिलेले... पण, दारावरचा सुरक्षारक्षक रुग्णालयाच्या आत सोडायला तयार नाही... समजावून सांगितले, विनंती केली, नाराजीचा सूर आळवला, वरिष्ठांकडे तक्रारीचा इशाराही दिला, पण कशालाच तो जुमानायला तयार नाही... अखेर, त्याच्यापुढे सपशेल माघार घेत पत्नीला आईजवळ पाठवले आणि मी घरची वाट धरली... कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात दिलीप शिंदे यांना आलेला हा भयंकर अनुभव.

शहरातील प्रमुख रुग्णालयांना खासगी सुरक्षारक्षकांच्या कड्यांनी कडेकोट वेढलेल्याचे आपल्याला दिसते. हे चित्र ससूनसारख्या सरकारी रुग्णालयांमध्येही दिसते. रुग्णालयांवरील, डॉक्‍टरांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी, रुग्णालयात आलेली मोठी गर्दी नियंत्रित करण्यासाठी हे सुरक्षारक्षक नियुक्त करणे, ही काळाची गरज असल्याचे वेगवेगळ्या रुग्णालयांच्या प्रशासनाचे  म्हणणे आहे. पण, या सुरक्षारक्षकांचा रुग्णाच्या नातेवाइकांना रोजच्या रोज येणारा अनुभव मात्र विदारक असल्याचे दिसते. 

शिंदे म्हणाले, ‘‘सुरक्षारक्षकाला अधिकृत पास दाखवला. तर, तो पास जप्त करा, असे फर्मान सोडतो. तंबाखू मळत प्रत्येक नातेवाइकांना रुग्णालयातून हुसकावणे इतकीच त्याची जबाबदारी आहे की, काय?  सुरक्षारक्षक बेपर्वा वर्तणूक करतात. हे सगळे तेथील ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद होतंय, याचं कोणतंच दडपण त्यांच्यावर नसतं. रुग्णावर उपचार चांगले होतात, या एकाच आशेवर हे अपमान गिळावे लागतात.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT