Hotel and Bar with closed for 3 days in Pune  
पुणे

CoronaVirus : पुण्यातील हॉटेल्स आणि बार 3 दिवस बंद; वैशाली, रुपाली, गुडलक बंद

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व हॉटेल बंद करण्याचे पोलिस आयुक्त यांचे आवाहन केले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत हॉटेल गुडलक, वैशाली, रुपाली आदी हॉटेल पुढील तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  दरम्यान, पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस (17 ते 19 मार्च) बंद ठेवावे, असे आवाहन पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनने सदस्यांना केले आहे. 

पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी शहरातील हॉटेलचालकांना व्यवसाय तात्पुरता बंद करण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. डेक्कन जिमखाना, गोखले रस्ता, जंगली महाराज रस्ता तसेच पुणे स्टेशन, महात्मा गांधी रस्ता आदी भागांतील अनेक हॉटेल्स सकाळी 11-12 वाजल्यानंतर बंद करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी फिरून त्या त्या भागातील हॉटेल बंद करण्याचे आवाहन करत होते. एरवी गजबजलेल्या बोहरी आळी, नेहरू रस्ता, महात्मा फुले मंडई आदी भागांतही बहुतेक किरकोळ विक्रेत्यांनी त्यांचा व्यवसाय बंद ठेवला होता.


बार, हॉटेल तीन दिवस बंद
शहरातील बार, हॉटेल आजपासून तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनने केले आहे. बंदबाबत संघटनेचे आवाहन असून, सक्ती नाही, असे संघटनेचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी स्पष्ट केले. शहरात सुमारे 1300 बार आणि रेस्टॉरंट्‌स आहेत. त्यात सुमारे 20 हजार कामगार काम करतात, तर दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होते.

नागरिकांचा परस्परांचा थेट येणारा संपर्क कमी व्हावा, संसर्गाला प्रतिबंद व्हावा, या उद्देशाने हॉटेल बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हॉटेलचालकांशी त्यासाठी संवाद साधण्यात येत आहे.
- दीपक लगड, पोलिस निरीक्षक, डेक्कन पोलिस ठाणे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT