crime
crime sakal
पुणे

खुर्ची न दिल्याच्या रागातुन टोळ्याकडून तरुणांना मारहाण, कोयत्याने वार

सकाळ वृत्तसेवा

बसण्यासाठी सराईत गुन्हेगारास खुर्ची न दिल्याच्या रागातुन गुंडासह त्याच्या साथीदारांनी तरुणाला जबर मारहाण केली.

पुणे - हॉटेलमध्ये बसण्यासाठी सराईत गुन्हेगारास खुर्ची न दिल्याच्या रागातुन गुंडासह त्याच्या साथीदारांनी तरुणाला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करुन केले. तसेच दुकानांवर दगडफेक करीत टोळक्‍याने दहशत निर्माण केली. हि घटना का कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली.

याप्रकरणी रुपेश घोरे, शुभम नाईक, अंक्‍या भोसले, अर्जुन उर्फ भावड्या जगताप, गणेश इंगळे, सोमा यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी लक्ष्मण मसय्या बंगारी (वय 23, रा. सिद्धार्थनगर, बिबवेवाडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या मारहाणीत फिर्यादी बंगारी, त्याचे मित्र राहुल खरात, मयूर भडाव्वे, गौस शेख जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश घोरे हा सराईत गुन्हेगार आहे. घोरे व त्याचे साथीदार कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये रात्री आले होते. त्यावेळी बंगारी, खरात, भडाव्वे तेथे चहा पित होते. आरोपी घोरेने त्यास बसण्यासाठी फिर्यादी बंगारी यास खुर्ची मागितली. मात्र बंगारीने त्यास नकार दिल्यानंतर घोरे व त्याचे साथीदार चिडले. त्यांनी आरडाओरडा करुन दहशत माजविली. "आम्ही या परिसरातील भाई आहोत. आमच्या नादी लागू नका, ' अशी धमकी देत त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर टोळक्‍याने कोयत्याने शेखवर वार केला. तर फिर्यादी बंगारीला दांडक्‍याने मारहाण करुन त्यांच्यावरही वार केला. खरात व भडाव्वे यांना मारहाण करुन त्यांच्या दुचाकीची तोडफोड केली. तसेच हॉटेल, बार व दुकानावर दगडफेक करुन दहशत निर्माण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT