पुणे

डिसेंबरमध्ये "अच्छे दिन'ची आस; हॉटेल व्यावसायिक प्रतीक्षेत

सकाळवृत्तसेवा

पुणे - ग्राहकांचा प्रतिसाद कसा असेल आणि कोरोनाची दुसरी लाट येईल की नाही या भीतीपोटी मी अद्याप हॉटेल बंद ठेवले आहे; मात्र आता परिस्थिती चांगली सुधारली आहे. तसेच अजून किती दिवस व्यवसाय बंद ठेवणार. त्यामुळे डिसेंबरअखेरीस गुन्हा श्री गणेशा करणार आहे. ग्राहक त्यांची सेवा करण्याची संधी देतील, अशी आस तुषार पाटील यांच्यासारख्या असंख्य हॉटेल व्यावसायिकांना लागली आहे. 

लॉकडाउन काळात सहा महिने बंद असलेल्या हॉटेल व्यवसायाला दिवाळीत चांगला बूस्टर मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील समाधानकारक वाढली आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये अच्छे दिन येणार असल्याची शक्‍यता हॉटेल व्यावसायिकांना आहे. त्यामुळे पाटील यांच्याप्रमाणे अनेक व्यावसायिक पुन्हा हॉटेल खुले करण्याच्या विचारात आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 70 टक्के हॉटेल या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत बंद होती; मात्र दिवाळीत मिळालेला नागरिकांचा प्रतिसाद आणि हॉटेलमध्ये येण्याबाबत ग्राहकांची झालेली सकारात्मक मानसिकता यामुळे दिवाळीनंतर हॉटेल सुरू केल्यास चांगले दिवस येऊ शकतात, असा विश्‍वास हॉटेल व्यावसायिकांना आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवाळीत पार्सल ऑर्डर घटली 
दिवाळीनिमित्त शहरातील अनेक बॅचलर आणि नोकरदार आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून येत असलेल्या पार्सलच्या ऑर्डर कमी झाल्या आहेत; मात्र याच काळात अनेकांनी सहकुटुंब हॉटेलात जाण्याचा मुहूर्त साधला. त्यामुळे हॉटेलचालकांचीदेखील दिवाळी गोड झाली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता शाळा सुरू होण्याची शक्‍यता आहे. शाळांबरोबर कॉलेजदेखील सुरू झाली तर कॉलेज परिसरातील कॅफे आणि छोट्या व्यावसायिकांना आधार मिळेल. कारण कॉलेजवर अवलंबून असलेल्या हॉटेल व्यावसायिकांची संख्यादेखील मोठी आहे. सेवा पुरवताना व जेवणाचा आनंद घेताना सर्वांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. 
- सुदीप रहाटे, हॉटेल व्यावसायिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT