पुणे

हॉटेल व्यवसायाला 'अच्छे दिन' 

सकाळवृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्रीय असो की दाक्षिणात्य पदार्थ, गुजराथी थाळी असो किंवा पिझ्झा व अन्य पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असो दिवाळीनिमित्त हॉटेल्स इंडस्ट्रीजला अच्छे दिन आले आहेत. घरी स्वयंपाक करण्यापेक्षा हॉटेल्समध्ये जाऊन आवडीच्या पदार्थांवर ताव मारायचा आणि मग विड्याचे पान खात खात गप्पागोष्टी करीत नागरिक दीपावलीचा आनंद घेत आहेत. अनेक रेस्टॉरंट "फॅमिली फंक्‍शन्स'च्या निमित्ताने बुक झाली असून सणासुदीत चार ते पाच कोटींहून अधिक उलाढाल होत असल्याचे रेस्टॉरंट असोसिएशनचे म्हणणे आहे. 

पुणे शहरात साधारणतः साडेतीन हजार रेस्टॉरंट आहेत. प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये सरासरी दीडशे ते दोनशे नागरिक एकावेळेस बसण्याची व्यवस्था आहे. तर काही रेस्टॉरंटकडे पाचशे-साडेपाचशेची व्यवस्था आहे. पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशनकडे साडेआठशे रेस्टॉरंट नोंदणीकृत आहेत. त्यात सत्तर टक्के रेस्टॉरंट शाकाहारी व तीस टक्के मांसाहारी आहेत. साधारणतः चाळीस ते पन्नास हजार कर्मचारी येथे नोकरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. येथे येणाऱ्या गिऱ्हाईकांकडून प्रत्येकी दररोज सरासरी दीडशे ते पाऊणे दोनशे रुपयांचे बिल होते. दिवाळीच्या चार दिवसांत लाखोंच्या संख्येने नागरिक रेस्टॉरंट मध्ये भोजनाचा आस्वाद घेतात. त्यामुळे चार ते पाच कोटी रुपयांहून अधिक उलाढाल या व्यवसायातून होत असल्याचे रेस्टॉरंट असोसिएशनचे म्हणणे आहे. त्यातही सर्वाधिक उलाढाल शाकाहारी रेस्टॉरंटची आहे. 

दिवाळीनिमित्त प्रत्येक दिवसाचे स्वतंत्र पॅकेजची हॉटेल व्यावसायिकांकडून खवय्या पुणेकरांना "ऑफर' देण्यात येत होती. त्यातही स्वादिष्ट, रुचकर पदार्थांची विशेष आवड असणारे पुणेकर महाराष्ट्रीय, गुजराथी, पंजाबी थाळी किंवा मंच्युरिअन, कॉंटिनेंटल, थाई, स्पॅनिश अशा विविध पदार्थांच्या रेस्टॉरंटना भेट देत आहेत. रेस्टॉरंट कामगारांच्याही वेळा यानिमित्ताने ठरवून दिल्या आहेत. 

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये दिवाळी आणि नाताळ हे सण सर्वधर्मीय नागरिक साजरे करतात. प्रामुख्याने समूहासोबत "एन्जॉयमेंट' करायला मिळते. त्यामुळे सर्वधर्मीय नागरिक भोजनाचे निमित्त करून एकत्र येतात. यामुळे दिवाळी, नाताळला अनेक जण घरी जेवण करण्यापेक्षा हॉटेल्समध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. 

रांधा-वाढा-उष्टी काढा हे गृहलक्ष्मीला बाराही महिने करावे लागते. "ती'लाही स्वयंपाकातून सुटी मिळावी, कुटुंब, नातेवाईक, मित्रमैत्रिणींसमवेत तयार भोजन घेता यावे, या उद्देशाने दिवाळीत आम्ही हॉटेलमध्ये जातो. भाऊबिजेला आम्ही नातेवाइकांसमवेत गुजराथी थाळीचा आस्वाद घेतला. 
- दिलीप पिंगळे, ग्राहक 

दिवाळी आणि नाताळमध्ये "फॅमिली गेट टूगेदर'ही संकल्पना रुजू लागली आहे. नेहमीपेक्षा अन्य पदार्थ खायची आवड असतेच. त्यामुळे कुटुंबीयांसमवेत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंटला पंधरा दिवस अगोदरच ऑर्डर्स येतात. 
गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशन. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला विवाहसोहळा! नवरा आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता

Mahatma Phule Jan Arogya Yojana: गरजू रुग्णांना मोठा दिलासा; महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून २३९९ प्रकारच्‍या आजारांवर उपचार

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील उत्तम नगर येथील आरोपीचे घर बुलडोझरने पाडण्यात येणार

Gujarat Crime: प्रसिद्ध मंदिराच्या बाथरूममध्ये दोन विद्यार्थिनी आढलल्या मृतावस्थेत ; ChatGPT ला विचारली जीवन संपवण्याची पद्धत

India Fuel Prices Stable : मोठी दिलासादायक बातमी ! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, होर्मुझ सामुद्रधुनीतून पहिली तेल खेप रवाना

SCROLL FOR NEXT