hotel damaged in fire accident sainagar society satavwadi fire brigade hospital  Sakal
पुणे

Pune Fire Accident : सातववाडीतील साईनगर सोसायटीतील आगीत हॉटेलचे नुकसान

सातववाडी येथील साईनगर सोसायटीच्या तळमजल्यातील भन्नाट बिर्याणी या हॉटेलमध्ये आग लागून नुकसान झाले. पाहटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने हॉटेलमध्ये कोणी राहत नसल्याने जिवीतहानी टळली.

सकाळ वृत्तसेवा

हडपसर : सातववाडी येथील साईनगर सोसायटीच्या तळमजल्यातील भन्नाट बिर्याणी या हॉटेलमध्ये आग लागून नुकसान झाले. पाहटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने हॉटेलमध्ये कोणी राहत नसल्याने जिवीतहानी टळली.

येथील रस्त्यालगत असलेल्या साईनगर इमारतीमध्ये अमित अदमानी यांचे दुकान असून त्यांनी ते केतन शिंदे यांना भन्नाट बिर्याणी या हॉटेल व्यवसायासाठी भाडेकराराने दिले आहे. आज (ता.११) पाहटे तीन वाजण्याच्या सुमारास या हॉटेलमधून धूर येत असल्याचा फोन अग्निशमन केंद्रात आला होता.

तात्काळ काळेबोराटेनगर, हडपसर व कोंढवा येथून अग्निशमन दलाची वाहने येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. जवानांनी दुकानातून एक कमर्शियल, एक रेसिडेन्शियल व एक पाच किलोचा सिलेंडर बाहेर काढला. या आगीत एका सिलेंडर फुटले आहे.आगीमध्ये फ्रिज, पाण्याच्या दोन टाक्या, पातेले, शेगडी, टेबल, काउंटर, खुर्च्या इत्यादी वस्तूंचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

काळे बोराटेनगर अग्निशामन केंद्रप्रमुख अनिल गायकवाड, राजू शेख, नारायण जगताप, फायरमन अनिमेश कोंडगेकर, केतन घाडगे, संकेत शिंदे, बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune corporation election: पुणे मनपा निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर; ४० वार्डांमध्ये चार सदस्य तर एक प्रभाग पाच सदस्यांचा

गोविंदाचं करिअर बुडण्याला ते चार लोक जबाबदार... सुनीता आहुजाने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, 'म्हणून आमच्यात भांडणं होतात'

Maharashtra Latest News Live Update : फुलंब्रीत पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा

Pro Kabaddi Rule: प्रो कबड्डीच्या रणभूमीत नवे तुफान! मोठे नियम बदलले, आता टायब्रेकरमुळे वाढणार थरार

Online Gaming Bill News : मोठी बातमी! राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंग’ विधेयकाला दिली मंजुरी

SCROLL FOR NEXT