Hotel Fire
Hotel Fire sakal
पुणे

Hotel Fire : वाघोलीत हॉटेलला आग; आगीत पूर्ण हॉटेल जळून खाक

सकाळ वृत्तसेवा

वाघोलीत पुणे-नगर महामार्गालगत असणाऱ्या टिटॉस हॉटेलला गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली.

वाघोली - वाघोलीत पुणे-नगर महामार्गालगत असणाऱ्या टिटॉस हॉटेलला गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये संपूर्ण हॉटेल आगीत जळून खाक झाले. तासाभराने आग आटोक्यात आली.

आग लागल्यानंतर हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. वाघोली पीएमआरडीए अग्निशामक दलाने दोन वाहनांच्या मदतीने हॉटेलच्या पुढील व मागील बाजूकडून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी अग्निशामक दलाला टँकर च्या साह्याने पाण्याची व आवश्यक मदत केली. या आगी मुळे वाघेश्वर मंदिर चौक ते बी जे एस कॉलेज पर्यंत महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तर बघ्यांची मोठी गर्दी होती. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी हॉटेल पूर्णपणे जळाले. शॉट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

सात गॅस सिलेंडर बाहेर काढले

आग लागली यावेळी हॉटेल मध्ये सात गॅस सिलेंडर होते. एका सिलेंडर मधील गॅस कमी झाला. मात्र सुदैवाने स्फोट झाला नाही. त्या सिलेंडर सह सात सिलेंडर जवानांनी बाहेर काढले.

सहा दिवसात वाघोलीत आगीची तिसरी घटना

सहा मे ला वाघोलीतील उबाळे नगर परिसरात एका कंपनीला सकाळी आग लागली. ती आग लगेच आटोक्यात आली. त्याच रात्री 11.30 वाजता त्याच परिसरातील इव्हेंटचे मटेरियल असणाऱ्या गोदामाला आग लागून तीन जण होरपळून मृत्यूमुखी पडले. तर गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हे टिटॉस हॉटेल जळून खाक झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Dabholkar Case Live Updates: दाभोळकरांच्या मारेकऱ्यांचा आज फैसला, थोड्याच वेळात निकाल वाचनाला सुरूवात

Suresh Jain: ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याने लोकसभेच्या धामधुमीत केला जय महाराष्ट्र! काय सांगितलं कारण ?

Axis Bank: धक्कादायक! ॲक्सिस बँकेची 22 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक! कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Watch Video: चक्क जन्मठेपेची शिक्षा झालेले 9 कैदी तुरुंगातून पास झाले बारावीची परीक्षा

Latest Marathi News Live Update : पिंपळवंडी येथे बिबट्या जेरबंद; परिसरातील नागरीकांनी सोडला सुटकेचा निश्वास

SCROLL FOR NEXT