Hotel, lodge, guest house decided not to start from today 
पुणे

हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरु होण्यासाठी पुणेकरांना आणखी वाट पाहावी लागणार, कारण...

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यभरातील रूम असलेले हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्याचा निर्णय सोमवारी राज्य शासनाने घेतला आहे. मात्र पुण्यातील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस सुरू होण्यास आणखी दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात करोना रुग्णांची  संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हॉटेल सुरू झाले तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे हॉटेल संघटना, पालकमंत्री आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत शुक्रवारी बैठक होईल. त्यानुसार आजपासून (ता.8) पुण्यात हॉटेल, लॉज आणि गेस्ट रूम सुरू होणार नाहीत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हॉटेल सुरू करण्याबाबत निर्णय घेताना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाने दिले आहेत. शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बुधवारपासून हॉटेल्स सुरू करण्यात येणार नाहीत. येत्या दोन दिवसांत हॉटेल व्यावसायिक संघटना, पालकमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक घेण्यात येईल. करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे या परिस्थितीत हॉटेल्स, लॉज सुरू करण्यास मान्यता देणे शक्य आणि संयुक्तिक होईल का, याचा आढावा त्यात घेण्यात येईल. त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. 

तोपर्यंत हॉटेल सुरू करणे योग्य नाही : 
हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस बंदच ठेवण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र परिस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत ती सुरू करणे योग्यही होणार नाही. त्याबाबतचा अंतिम निर्णय शुक्रवारनंतरच जाहीर केला जाईल, असे आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.

राज्य सरकारने या सुविधा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी महापालिका प्रशासनाने तुर्तास त्यास स्थगिती दिली आहे. शुक्रवारी प्रशासनाची बैठक झाल्यानंतर त्यात नियमावली निश्चित करण्यात येईल आणि त्यानंतर परवानगी मिळू शकते, असा अंदाज आहे. शहरातील कोरोनाची परिस्थिती पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. 
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT