Hotel Sakal
पुणे

हॉटेलला कोरोनाचा विळखा; लाखभर बेरोजगार

शहरातील अनेक मोठ्या हॉटेल, रेस्टॉरंटच्या बाहेर पानटपऱ्या, आइस्क्रीम, किरकोळ वस्तूंची विक्री करणारे दुकाने आहेत.

सनील गाडेकर

पुणे - गेल्या तीन वर्षांपासून मी बाणेरमधील एका हॉटेलात (Hotel) कूक म्हणून कामाला होतो. मात्र, कोरोनामुळे (Corona) ते हॉटेल आता बंद पडले. त्यापूर्वी सहा महिने अर्ध्या पगारावर काम केले. नोकरी गेल्याने घरखर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्यवसायाची (Business) आर्थिक स्थिती खालावल्याने दुसरीकडे कोणी कामही देत नसल्याची खंत संतोष कुमार (Santosh Kumar) यांनी व्यक्त केली. (Hotel Loss by Coronavirus and Lockdown Many Peoples Unemployed)

संतोष यांच्याप्रमाणे अनेक हॉटेल कामगारांवर सध्या रोजगार गमाविण्याची वेळ आला आहे. हॉटेलवर आलेल्या निर्बंधांमुळे या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत. सध्या सुरू असलेली हॉटेल देखील पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल क्षेत्रात कार्यरत असलेले सुमारे एक लाख कामगार कोरोनामुळे बेरोजगार झाले आहेत. कोरोनापुर्वी दोन्ही शहरात सुमारे अडीच लाख हॉटेल कामगार होते. ती संख्या आता दीड लाखापर्यंत खाली आल्याचे हॉटेल व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील अनेक मोठ्या हॉटेल, रेस्टॉरंटच्या बाहेर पानटपऱ्या, आइस्क्रीम, किरकोळ वस्तूंची विक्री करणारे दुकाने आहेत. मात्र, हॉटेलला प्रतिसाद नसल्याने या दुकानांचा व्यवसाय देखील ठप्प झाला आहे. त्यामुळे अनेकांनी आपला व्यवसाय गुंडाळण्याची वेळ आली आहे.

कोरोनामुळे हॉटेल बंद झाल्याने किंवा ते पूर्ण क्षमतेत सुरू नसल्याने कामगारांची कपात करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली, त्यामुळे सुमारे एक लाख कामगार बेरोजगार झाले. हॉटेल क्षेत्र पुन्हा सुरळीत झाल्यास या कामगारांनादेखील मोठा दिलासा मिळेल.

- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलियर्स असोसिएशन

कामगारांची स्थिती

  • हॉटेलात व्यवसाय होत नसल्याने अनेकांना पूर्ण पगार नाही

  • रोजगार गमावलेल्यांना दुसरीकडे कामही मिळेना

  • गावी गेलेले अनेक कामगार अद्याप परतले नाहीत

  • कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती घरी बसून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: म्हाडाची घरे खरंच परवडणारी? मुंबईतील घरांच्या किमती एक काेटीच्या पुढे

Lightning Strike Death : साताऱ्यात अवकाळीचे तांडव! वीज अंगावर कोसळून महिला ठार; वाई-खंडाळ्यात 35 निष्पाप मुक्या जीवांचा अंत

Fuel Shortage Rumor : युद्धाच्या अफवेने 'इंधन' भडकलं! मुक्ताईनगरमध्ये 500 लिटरच्या प्लास्टिकच्या टाक्यांत भरलं जातंय पेट्रोल-डिझेल; पाहा धक्कादायक Video

Pune News: पुणे ‘आरटीओ’त लाचखोरीचा ‘कळस’; वाहननिरीक्षकाची तक्रार, पदोन्नतीला ‘ब्रेक’ची शक्यता, त्या’ बड्या धेंडांवर कारवाई होणार का?

Summer Fashion Tips: उन्हाळ्यात दिवसभर कूल, फ्रेश आणि सुपर स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ फॅब्रिक्स नक्की ट्राय करा!

SCROLL FOR NEXT