पुणे

किरकोळ बाचाबाचीतून सहजपूरला युवकाचा खून

CD

खुटबाव, ता. १२ : सहजपूर फाटा (ता. दौंड) येथे सोमवारी (ता. ११) एका हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीतून एका युवकाचा खून झाला. धनराज शिवाजी भुरके (वय ३९, रा. अंबुलगा मेन, ता. निलंगा, जि. लातूर), असे त्याचे नाव आहे.
सहजपूर फाटा येथील ओऍसिस हॉटेलमध्ये दयानंद विश्वनाथअप्पा भुरके, त्यांचा मित्र अक्षय निगडे व पुतण्या धनराज (तिघेही रा. अंबुलगा मेन) हे जेवण करताना परमीट रूममध्ये दारू पित होते. यावेळी धनराज हे बाथरूमला जात असताना समोरच्या टेबलावर बसलेल्या आरोपींना धक्का लागला. यावरून बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी माउली पांडुरंग जाधव, विशाल मारुती धेंडे (दोघेही रा. उरुळी कांचन, ता. हवेली), नवाज रियाज तांबोळी (रा. यवत, ता. दौंड) यांनी धनराज याला लाथाबुक्क्यांनी व खुर्चीने जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. यावरून यवत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात मोठा बदल? पेन्शनधारकांना मिळू शकते ४५ हजारांची किमान पेन्शन

Pune Stunt Video : पुण्यात परप्रांतीय तरुणांचा मध्यरात्री धिंगाणा, दारूच्या नशेत भरधाव कारमधून जीवघेणी स्टंटबाजी अन्... व्हिडिओ व्हायरल

CIDCO Housing Lottery: स्वातंत्र्य दिनानिमित्त ४,७७९ घरांची लॉटरी सिडकोची 'ईडब्ल्यूएस'साठी संधी

Hardik Pandya Trade: मोठा ट्विस्ट! Mumbai Indians च्या हार्दिकला पुन्हा गुजरात टायटन्सकडे जायचंय, कर्णधार व्हायचंय; शुभमन गिलचं काय होणार?

Marathi News Live Updates : श्रावणात त्र्यंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन बंद

SCROLL FOR NEXT