पुणे

हॉटेल व्यवसायिक देतोय कामगारांना पगार व जेवणही

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी इतर राज्यातून रोजगारासाठी आलेल्या कामगारांनी महाराष्ट्रातच थांबावे अशी सूचना प्रशासन मार्फत काढण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर वारजेतील एका हॉटेल चालकाने आपल्या येथील कर्मचाऱ्यांना हॉटेलवर थांबवून संसर्गाच्या साखळीला ब्रेक लावला आहे.

वारजे येथील 'शौर्य' या हॉटेलचे मालक सागर बेलदारे यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या विविध राज्यातून आलेल्या अकरा कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यास रोखले आणि त्यांना आर्थिक अडचण येऊ नये म्हणून त्यांचे पगार सुद्धा सुरू ठेवले आहेत. त्याचबरोबर ते दररोज सुमारे दीड हजार जेवणाचे पॅकेट गरजू नागरिकांना पुरवत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत बोलताना बेलदारे म्हणाले, "कोरोना हा वेगाने पसरत असलेला रोग असून या कर्मचार्यांना मी या संदर्भातील माहिती दिली. त्यांना सांगितले की कदाचित तुम्ही आपल्या राज्यात व कुटुंबात हा रोग घेऊन जाण्याचे कारण ठराल. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांनी इथेच थांबणे योग्य आहे. तसेच त्यांचा पगार होत राहील याची काळजी घेत आहे. तसेच त्यांच्या राहण्याची सुविधा करून दिली आहे व त्यांचे लाईटचे बील व घरभाडे घेत नाही. याचबरोबर शहरातील विविध भागांमध्ये गरजूंना रोज जेवणाचे वाटप करत आहे. यामध्ये पालिकेच्या 'शेल्टर होम'मध्ये सुद्धा जेवण देण्यात येत आहे. सुरवातीला हा उपक्रम मी स्वतः सुरू केला व नंतर वारजे पोलिस व विविध संस्थांना या उपक्रमाबाबत समजल्यास त्यांनी देखील यात सहभाग घेतला."

जेवण वाटप उपक्रमात छावा स्वराज सेना, आपत्ती व्यवस्थापन आणि संशोधन संस्था (डिमार्फ), युवराज बेलदारे सामाजिक संस्था, ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट व वंदे मातरम संगठना या संस्थांचा समावेश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून 25 दिवसांमध्ये तीस हजाराहून अधिक जेवणाचे पॅकेट वाटण्यात आले असल्याचे बेलदारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT