The house of a builder in Pune has been burglarized 
पुणे

बांधकाम व्यावसायिकाच्या घरी फिल्मी स्टाइलने झाली चोरी

सनिल गाडेकर

पुणे : शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी 6 लाख 70 हजार रुपयांची फिल्मी स्टाइल चोरी करण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी वसंतबाग सोसायटीमध्ये घडली. चोरी करणारे आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी बिबवेवाडी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा तेजस प्रवीण दुगड (वय 29) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजस आणि त्याच्या भावाचा बंगला शेजारी-शेजारी आहे. तेजस व त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या घरामध्ये एक चोरटा घुसला होता. त्याने वरच्या मजल्यावरील कपाटाच्या ड्रॉवरमधून 6 लाख 70 हजाराची रोकड चोरली व एका बॅगेत भरली. बॅगेसह खाली उतरता येत नसल्याने त्याने ती बॅगवरून खाली टाकली. मात्र ती नेमकी फिर्यादींच्या भावाच्या घराच्या व्हरांड्यात पडली. ती बॅग फिर्यादींच्या भावाच्या घरातील आचारी देवजी सोळंकी यांना सापडली. त्यांनी ती तातडीने तेजस यांची वहिनी मोनल दुगड यांच्याकडे दिली. त्यामुळे बॅग आणण्यासाठी चोरटा फिर्यादींच्या भावाच्या घरी गेला. 

माझ्या आत्याची बॅग तुमच्या घरात पडली आहे. ती मला द्या, अशी मागणी चोरट्याने सोळंकी यांच्याकडे केली. ही बाब सोळंकी यांनी मोनल यांना सांगितली. त्यानंतर त्या बॅग घेऊन घराबाहेर आल्या. मात्र त्यांनी चोरट्याला बॅग हवी असेल तर तुझी ओळख सांग, खात्री पटल्यावरच आम्ही बॅग देऊ असे सांगितले. यामुळे चोरट्याने त्यांच्या हातातील बॅग हिसकावत पळ काढला. त्याला मोनल यांच्या वाहनचालकाने अडवले. चोरट्याने वाहनचालकला हाताने मारहाण करत घराबाहेर पळ काढला. तेथे त्याचा एक साथीदार दुचाकीवर उभा होता. त्याच्या दुचाकीवरून दोघे पसार झाले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे म्हणाले, बांधकाम व्यावसायिकाच्या दोन्ही मुलांचे बंगले एकमेकांशेजारी आहेत. यातील तेजस यांच्या घरातील रोकड चोरल्यावर आरोपीने बॅग खाली टाकली होती. मात्र ती नेमकी तेजस यांच्या भावाच्या घरात पडली. ही बॅग स्वतः:ची असल्याचा बहाणा करत चोरट्याने मोनल यांच्या हातातून बॅग हिसकावली. आरोपीच्या मागावर पोसिलांची पथके रवाना करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT