House sakal
पुणे

‘सर्वांसाठी घरं’ उपक्रम प्राधान्याने राबविणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर (House)मिळाले पाहिजे, हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे. ‘सर्वांसाठी घरं’ हा उपक्रम महाविकास आघाडी सरकार प्राधान्याने राबविणार असून, म्हाडाचे (MHADA)प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

येथील जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात शुक्रवारी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) ४ हजार २२२ नवीन सदनिकांची ऑनलाइन सोडतीचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झालेल्या या ऑनलाइन कार्यक्रमास गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील व्हीसीद्वारे उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी अधिकारी नितीन माने-पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, (Ajit Pawar)सामान्य माणसाला घर आणि बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठे निर्णय घेतले. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. कोरोना संकटकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतले आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळाली. राज्यातल्या सर्वांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरं’ कार्यक्रमांतर्गत सर्वांना हक्काचं घरं देण्याचा प्रयत्न आहे. कोरोनामुक्तीसाठी लसीकरण हेच मोठे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

निराश न होता पुढील सोडतीत भाग घ्यावा

म्हाडाच्या (MHADA)ऑनलाइन सोडतीमध्ये ज्यांना हक्काची घरे मिळणार आहेत, त्यांचे पवार यांनी अभिनंदन केले. तसेच, इतरांनी निराश न होता, म्हाडाच्या पुढील सोडतीत भाग घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT