पुणे

सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी व्हॉट्सॲपवर मोफत मार्गदर्शन

CD

पुणे, ता. ३ : गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत सदस्यांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन आता थेट व्हॉट्सॲपवर मिळणार आहे. ‘ड्रीम्स रीडेव्हलप्ड’ने ‘रीडेव्हलपमेंट गुरु’ ही व्हॉट्सॲप आधारित सेवा सुरू केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक एस. लक्ष्मीनारायणन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुनर्विकास प्रक्रियेत सदस्य आणि विकासक यांच्यातील माहितीची दरी कमी करण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे. सदस्यांनी पुनर्विकासासंदर्भातील प्रश्‍न व्हॉट्सॲपवर विचारल्यानंतर महारेरा, नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नोंदी तसेच संबंधित नियमांच्या आधारे उत्तरे देण्यात येणार आहेत. विकासक, सोसायटीची व्यवस्थापन समिती, वास्तुविशारद आणि कायदेविषयक तज्ज्ञांशी चर्चा करताना कोणते प्रश्‍न विचारावेत, याबाबतही या सेवेतून मार्गदर्शन केले जाणार आहे.
पुनर्विकासाचा निर्णय सोसायटीच्या सदस्यांसाठी महत्त्वाचा निर्णय असतो. विकासकांना अशा प्रकल्पांचा रोजचा अनुभव असतो. मात्र, सदस्यांना कायदेशीर, आर्थिक, तांत्रिक आणि नियामक बाबींची पुरेशी माहिती नसल्याने निर्णय घेताना अडचणी येतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या प्रक्रियेबाबत अचूक आणि सहज माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही सुविधा सुरू केल्याचे लक्ष्मीनारायणन यांनी सांगितले.
या सेवेचा वापर करण्यासाठी ९६९९६५३५९२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘Guru’ असा संदेश पाठवून प्रश्‍न विचारता येणार असून, ही सेवा मोफत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कार्यरत असलेली ही संस्था पुढील टप्प्यात आपली सेवा महाराष्ट्रभर विस्तारण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

टिटवाळ्यातील कामामुळे आंबिवलीत प्रवासी रखडले, स्टेशन मास्टर कार्यालयात प्रवाशांनी घातला गोंधळ

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Egg Freezing & Future Fertility: आई-वडिल होण्यासाठी अंडी फ्रीज करण्याचा विचार करताय? आधी ‘या’ ४ गोष्टी समजून घ्या

SCROLL FOR NEXT